विषारी साप चावल्याने युवकाचा मृत्यू

                     (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (११ ऑक्टो.) : विषारी साप चावल्याने बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच आज विषारी सापाच्या दंशाने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील चारगाव चौकी येथे राहत्या घरी युवकाला साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला. वातावरणातील बदलामुळे सापं थंडावा शोधत राहत्या घरात शिरू लागली आहेत. घराचा आडोसा घेऊन बेसावध नागरिकांना दंश करून त्यांच्या मृत्यूचे कारण बानू लागली आहे. 

वणी तालुक्यातील चारगाव चौकी येथे राहणाऱ्या युवकाला घराच्या आड्यावर दडून बसलेल्या सापाने दंश केला. पवन वसंता पचारे (२७) हा युवक घराच्या दरवाजातून बाहेर पडत असतांना त्याच्या उजव्या खांद्याला विषारी सापाने चावा घेतला. ही घटना दि. १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. विष शरीरात पसरल्याने त्याचा मृत्यू झाला. घराच्या दरवाज्यातून बाहेर पडतांना सापाच्या रूपात काळ आडवा आला, व युवकावर अकाली मृत्यू ओढवला. त्याच्या या अकाली मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
विषारी साप चावल्याने युवकाचा मृत्यू विषारी साप चावल्याने युवकाचा मृत्यू Reviewed by सह्याद्री चौफेर on October 11, 2021 Rating: 5
Powered by Blogger.