वराेरा तहसील कार्यालयातील महिला तहसीलदारांचा मनमानी कारभार; ऐन सणासुदीच्या दिवसात वेतनापासून ठेवले कर्मचाऱ्यांना वंचित
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (१७ ऑक्टो.) : प्रत्येक महिण्यांच्या ५ तारखे पर्यंत महसुल विभागाच्या कर्मचा-यांचे वेतन त्यांचे बँक खात्यात जमा व्हावे असे नियम शासनाचे पूर्वी पासून असुन सुध्दा वराेरा तहसील कार्यालयाच्या महिला तहसीलदार यांचे आडमुठी व मनमानी कारभारामुळे त्यांचे वेतन त्यांना ऐन विजयादशमी सणाच्या दिवशी न मिळाल्याची खंत वराे-याचे तलाठी विनाेद खाेब्रागडे यांनी व्यक्त केली आहे .दरम्यान येथील कार्यरत ३२ पटवारी, ६ मंडळ अधिकारी व २३ काेतवाल वर्गात अक्षरशा वराेरा तहसीलदार विषयी नाराजीचा सुर उमटला आहे. मागिल महिण्यांच्या वेतनास चक्क १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी लाेटला असल्याचे विनाेद खाेब्रागडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बाेलतांना सांगितले. काेराेना सारख्या महाभयानक परिस्थितीत या कर्मचा-यांनी आपला जिव धाेक्यात टाकुन इमाने इकबारे आपले काम केले आहे.
सध्याच्या स्थितीत त्यांचेकडे अधिक कामाचा व्याप असतांना देखिल पटवारी व काेतवाल वर्गांनी व्यवस्थितपणे ई पीक पाहणीचे काम काम केले आहे. तेव्हढ्याचं जबाबदारीने मंडळ अधिका-यांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे. तरी सुध्दा काही तलाठ्यांना तहसीलदार यांनी कारणे दाखवा नाेटीसा बजावल्या असल्याचे कळते. मुळातच ज्या तलाठ्यांचे किंवा कर्मचा-यांचे काम समाधानकारक नसेल तर नियमानुसार त्यांचेवर कारवाया कराव्या पण, त्यांचे मासिक वेतन राेखु नये हा एक सर्वसाधारण नियम असल्याचे कर्मचारी वर्गात बाेलल्या जाते. परंतु या ही नियमाला बगल देत तहसीलदार यांनी विजया दशमी पर्यंत तेथील पटवारी मंडळ अधिकारी व काेतवाल यांचे वेतन त्यांचे बँक खात्यात जमा केले नाही. त्यामुळे या कर्मचारी वर्गात महिला तहसीलदार विषयी नाराजी व्यक्त केल्या जात आहे.
दरम्यान काही तलाठ्यांना त्यांचे असमाधान कामाबाबत कारणे दाखवा नाेटीसा बजावल्या असल्याचे व्रूत्त असून त्याच नाेटीसात एकाच तलाठी साजाला दाेन तलाठी दर्शविले आहे. एकाच तलाठी साजाला दाेन तलाठ्यांची शासनाने नेमणूक केली आहे का? हा ही एक महत्वाचा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित झाला आहे.
वराेरा तहसील कार्यालयातील महिला तहसीलदारांचा मनमानी कारभार; ऐन सणासुदीच्या दिवसात वेतनापासून ठेवले कर्मचाऱ्यांना वंचित
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 17, 2021
Rating:
