सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी, (०४ सप्टें.) : वणी तालुक्यातील मोहदा कृष्णापूर रस्त्यावरील मध्यभागी मोठा जीवघेणा खड्डा पडला होता, हा खड्डा बुजवण्यात यावा, याकरिता मोहदा येथील उपसरपंच सचिन रासेकर यांनी ह्या खड्याची माहिती संबंधित प्रशासन लोकप्रतिनिधी यांना दिली. मात्र, गेली दहा दिवस लोटूनही या खड्डयाकडे कोणाही लक्ष द्यायला तयार नव्हते, किंबहुना खड्डा बुजावण्यासाठी विलंब होत होता. श्री. रासेकर यांनी 'सह्याद्री न्यूज'चे सर्वेसर्वा कुमार अमोल यांच्या शी चर्चा करून वृत्त सादर करण्याची आग्रही आर्तहाक केली. या आधी ही मोहदा येथील समस्या ला वाचा फोडण्याचे सह्याद्री न्यूज ने कामं केली आहे. त्यामुळे काल (ता.०३ सप्टें.) ला खड्याचे वृत्त पब्लिश करताच सदर खड्डा बुजावण्याला सुरुवात झाली. असे मोहदावाशी उपसरपंच सचिन रासेकर यांनी सांगितले आहे.
पुढे असेही ते म्हणाले की, हे केवळ "सह्याद्री न्यूज"मुळे शक्य झाले. त्यामुळे सह्याद्री चे शतशः आभार. असेच सहकार्य लाभोत, हे उपसरपंच श्री.रासेकर आवर्जून सांगतात. दरम्यान, रस्त्यावरील खड्डा बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले असून,तो खड्डा बजावण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गांवरील प्रवास आता सुखकर झाल्याचे समाधान रासेकर यांनी व्यक्त केले असून, संबंधित विभागाने आपल्या कामाचे सौदार्य दाखवल्याबद्दल त्यांचे ही नागरिकांच्या वतीने आभार मानले आहे.
सह्याद्री न्यूज ची घेतली दखल : अखेर "त्या" रस्त्यावरील खड्डा बुजवला गेला - सचिन रासेकर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 04, 2021
Rating:
