जीवन प्राधिकरणच्या खड्ड्यात उतरुन मनसेचं जलसमाधी आंदोलन

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
यवतमाळ, (१२ सप्टें.) : जीवन प्राधिकरण ने अमृत योजनेकरिता खोदलेल्या गड्या त काही दिवसांपूर्वी माणूस पडून मरण पावला त्याकारिता चर्च जवळील खड्यात मनसे कार्यकर्त्यांनी समाधी आंदोलन केले. व जोरदार नारेबाजी करीत भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार यांच्या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सदर कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करा या प्रमुख मागणी सह मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार मनविसे जिल्हाध्यक्ष  हमदापुरे यांच्या नेतृत्वात खड्यात उतरून जवळपास दीड तास जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांना खड्यात उतरून आंदोलन लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मनसे चे अनोखे आंदोलन बघता शेवटी जीवन प्राधिकरण ने मागण्या मान्य केल्या. 

अमृत योजनेचे खड्डे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत असून या खड्यात पडून एका नागरिकाचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर मनसे आक्रमक झाली असून, मनसे कार्यकर्त्यांनी २० फूट खड्ड्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले आहे. 

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, मनविसे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे, शहर अध्यक्ष अ‍ॅड. अमित बदनोरे, अब्दुल साजिद, विकास पवार, विनोद दोदल, सुमित झाडे, पिंटू पिंपळकर, विलास बट्टावार, संदीप भिसे, मयूर मेश्राम, सादिक शेख, सचिन येलगंधेवार, कपिल ठाकरे उपस्थित होते.
जीवन प्राधिकरणच्या खड्ड्यात उतरुन मनसेचं जलसमाधी आंदोलन जीवन प्राधिकरणच्या खड्ड्यात उतरुन मनसेचं जलसमाधी आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on September 12, 2021 Rating: 5
Powered by Blogger.