मंदिरात पूजेसाठी गेलेल्या महिलेचे ठगबाजाने पळविले दागिने

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०५ सप्टें.) : पूजेसाठी मंदिरात गेलेल्या वृद्ध महिलेला एका ठगबाजाने त्यांच्या हस्ते पूजा करण्याचा बनाव करून सोन्याचे दागिने पळविल्याची खळबळजनक घटना काल ४ ऑगष्टला शहरातील जुन्या स्टेट बँक समोरील श्रीराम मंदिरात घडली. महिलेचे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात ठगबाजाने ठगऊन नेल्याने मंदिरातही ठगबाजांचा वावर असल्याचे दिसून येत आहे. मंदिरासारख्या ठिकाणीही ठगबाजी होऊ लागल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

शहरातील जुन्या स्टेट बँक जवळील श्रीराम मंदिरात पूजेकरिता गेलेल्या वृद्ध महिलेच्या सोन्याच्या दागिन्यांवर अज्ञात ठगबाजाने हातसाफ करून महिलेला गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. सुनंदा अरविंद वैद्य (७५) रा. जुनी स्टेट बँक, श्रीराम मंदिरा जवळ असे या ठगवल्या गेलेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला मंदिरात पूजा करत असतांना एक अज्ञात इसम त्या महिलेजवळ आला. त्याने आपल्या नविन दुकानाचे आज उद्घाटन असल्याचे सांगत त्या महिलेच्या हातून या शुभकार्य प्रसंगी ११०० रुपये मंदिराला दान देण्याची इच्छा व्यक्त केली. महिलेनेही निसंकोच त्याची इच्छा पूर्ण केली. नंतर त्याने दुकानाच्या भरभराटीकरिता पूजाविधीत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने ठेवण्याची विनंती केली. महिलेने त्यांच्या अंगावरील दागिनेही पूजेत ठेवले. महिलेला समोरच्या व्यक्तीच्या मनात काळभेर असल्याची पुसटशीही कल्पना न आल्याने त्यांनी किंमती दागिनेही त्याच्या समोर ठेवले. संधी सोडून या ठगबाजाने महिलेचे दागिने घेऊन पोबारा केला. महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांना चांगलाच धक्का बसला. त्यांच्या अंगावर अनेक सोन्याची आभूषणं होती. त्यांनी संपूर्ण सुवर्ण पूजेच्या ठिकाणी न ठेवता गळ्यातील सोन्याची मोहन माळ व हातातील सोन्याच्या दोन बांगड्याच ठेवल्याने त्यांचं मोठं नुकसान होण्यापासून वाचलं. पण ४० ग्राम सोन्याचे दागिने पळवून नेत ठगबाजाने महिलेला गंडा घातलाच. पूजेच्या नावावर दुजचं कार्य करून महिलेला ६० हजारांची चपेट दिली. याबाबत सुनंदा अरविंद वैद्य यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि च्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

पुढील तपास पोलिस करित आहे.
मंदिरात पूजेसाठी गेलेल्या महिलेचे ठगबाजाने पळविले दागिने मंदिरात पूजेसाठी गेलेल्या महिलेचे ठगबाजाने पळविले दागिने Reviewed by सह्याद्री चौफेर on September 05, 2021 Rating: 5
Powered by Blogger.