टॉप बातम्या

आदर्श समाज निर्मितीत शिक्षकांची भूमिका महत्वाची असते- डॉ. सौ. मीनलताई पाटील खतगावकर

सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (१० सप्टें.) : बिलोली- शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यास सुसंस्कृत बनवितात. त्यामुळे आदर्श समाज निर्माण होण्यास हातभार लागतो म्हणून शिक्षक हे आदर्श समाज निर्मितीत महत्वाची भूमिका बजावतात. शिक्षकांनी नवीन नवीन ज्ञान विद्यार्थ्यांना देऊन त्यांना भारताचा सक्षम नागरिक बनवण्याचे कार्य करावे असे प्रतिपादन गोदावरी मनार चॅरीटेबलच्या ट्रस्टच्या सचिव डॉ.सौ.मीनलताई पाटील खतगावकर यांनी शिक्षक दिनानिमित्त आयोजित समारंभात अध्यक्षीय समारोपा प्रसंगी केले.

गोदावरी मनार चारीटेबल ट्रस्ट संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्री साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, व आणि साईबाबा प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा गौरव करण्यासाठी समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव डॉ. सौ. मीनलताई पाटील खतगावकर या होत्या. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर डॉ.सौ.मीनलताई पाटील खतगावकर यांच्या त सत्कार करण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी पिंपळे यांनी प्रास्ताविक करताना पुढील वर्षापासून ट्रस्टतर्फे आदर्श शिक्षकांची निवड करून त्यांचा सन्मान करण्याचा मनोदय व्यक्त केला. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणूनबोलताना प्रा. डॉ. शरदचंद्र देगलूरकर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे तत्वज्ञान आणि कार्य याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. जी.व्ही.पांचाळ यांनी केले तर प्रा. डॉ. एस.एन.कबाडी यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. विश्वनाथ रत्नाळीकर, मुख्याध्यापक धनंजय शेळके, मुख्याध्यापक धोंडीबा वडजे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Previous Post Next Post