सह्याद्री न्यूज नेटवर्क |
वणी, (२० सप्टें.) : शहरातील सुपरिचत संस्था स्माईल फाउंडेशन द्वारा 'हात मदतीचा, मदत माणूसकीला' या उपक्रमाला सुरूवात झाली आहे.
या उपक्रमाद्वारे लोकसहभागातून विविध कार्यक्रम राबवले जाणार आहे. यात वृक्षारोपण, व्हीलचेअर वाटप, ब्लँकेट वाटप, कपडे वाटप, सायकल वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, पुस्तके वाटप, खेळणी वाटप इत्यादी कार्यक्रम राबवले जाणार आहे. या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे, आवाहन स्माईल फाउंडेशनचे सर्वेसर्वा अध्यक्ष सागर जाधव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
मागील लॉकडाऊनपासून विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या "स्माईल फाउंडेशन"द्वारा आता 'हात मदतीचा, मदत माणूसकीला' या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. हा उपक्रम लोकसहभागातून व लोकांच्या मदतीतून चालणार आहे.
या उपक्रमात ज्यांच्याकडे रोपटे, बिया, जुने ब्लँकेट, नवीन कपडे, स्वेटर, सायकल, पु्स्तके, खेळणे इत्यादी वस्तू लोकांकडून गोळा करून त्या गरजुंपर्यंत पोहोचवल्या जाणार आहे. याशिवाय इच्छुकांना यात नवीन वस्तूही दान करता येणार आहे. शुभप्रसंगी, वाढदिवस, स्मृती प्रित्यर्थ इत्यादी दिवशीही विशेष कार्यक्रमाद्वारे हा उपक्रम राबवला जाणार आहे.
उपक्रमात सहभागी होऊ इच्छीणाऱ्या व मदतीसाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी स्माईल फाउंडेशनशी संपर्क साधावा असे, आवाहन सागर जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 7038204209 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पियुष आत्राम, आदर्श दाढे विश्वास सुंदरानी, सचिन जाधव, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, तन्मय कापसे, तेजस नैताम, तुषार वैद्य, अनिकेत वासरीकर, दिनेश झट्टे, सचिन काळे, परीश्रम घेत आहे.
स्माईल फाउंडेशन ही एक सामाजिक संघटना असून विविध सामाजिक, पर्यावरण, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहे. हे विशेष..
स्माईल फाउंडेशन द्वारे 'हात मदतीचा, मदत माणूसकीला' उपक्रमला सुरुवात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 20, 2021
Rating:
