वणी वरोरा मार्गावर कोसळला विशाल वृक्ष

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०९ सप्टें.) : वणी वरोरा या प्रमुख रहदारीच्या मार्गावर एक विशाल वृक्ष मुळासकट कोलमडून पडल्याची घटना आज सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडली.

पंचायत समिती शिक्षण विभागाच्या कार्यलया समोरील मुख्य रस्त्यावरच हा विशाल वृक्ष कोसळल्याने एकेरी मार्गाची वाहतूक पूर्णता प्रभावित झाली. हा रोड नेहमी रहदारीने गजबजलेला असतो. या रस्त्याच्या कडेला अनेकांनी दुकानेही थाटली आहेत. परंतू सुदैवाने कोणतीही जिवित व वित्तहानी झालेली नाही. एक दुचाकी धारक दुचाकीसह झडाखाली दबल्याचे प्रत्यक्ष दर्शिनी सांगितले. त्याला झाडाच्या फांद्या तोडून सुखरुप बाहेर काढण्यात आल्याचेही सांगण्यात येते. त्याला कुठलीही दुखापत झाली नसुन मानेजवळ खरचटल्याचे सांगण्यात येते. शहरात सतत मुसळधार व संततधार पाऊस सुरु असून अती पावसामुळे झाडे कोलमडू लागली आहे.

शहरातून जाणारा वणी वरोरा मार्ग नेहमी रहदारीने गजबजलेला असतो. या मार्गावर हा विशाल वृक्ष कोसळल्याने मोठा अनर्थ होण्यापासून वाचला.
वणी वरोरा मार्गावर कोसळला विशाल वृक्ष वणी वरोरा मार्गावर कोसळला विशाल वृक्ष Reviewed by सह्याद्री चौफेर on September 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.