वरोऱ्यात आयपीएल वर सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक, बावणे ले-आऊटात कारवाई

                    (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (३० सप्टें.) : सटोऱ्यासाठी पर्वणी ठरत असलेल्या आयपीएल-२० क्रिकेट सामन्यांवर लाखोंचा सट्टा लावला जातो. क्रिकेट बेटिंगवर लगवाडी लावणारे व लगवाडी घेणारे मोबाइल द्वारे अतिशय गुप्तपणे हा क्रिकेट सट्टयाचा खेळ खेळत असतात. बुकी आपल्या प्यादयांना गुप्त जागी बसवुन त्यांच्या मार्फत हा क्रिकेट सट्टा ऑपरेट करतात. संशयाची पालही चुकचुकणार नाही, असे ठिकाण हे बुकी क्रिकेट सट्टा घेण्याकरीता बसवणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्याकरिता निवडतात. सध्या बुकिंनी लोकवस्तीमध्ये सट्टा घेणारे आपले कर्मचारी बसविले आहेत. लोकांची निवासस्थाने असलेल्या ठिकाणी घर व फ्लॅट रेंटवर घेऊन तेथे सर्व साहीत्यासह सट्टा घेणाऱ्यांना बसविले जाते. बावणे ले आऊट मधील काकडे यांचे घरी चालविण्यात येणाऱ्या क्रिकेट सट्टा अड्यावर पोलिसांनी धाड टाकुन क्रिकेट सट्टा घेणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडुन 1 लाख 69 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

बावणे ले-आऊट मधील एका घरा मध्ये क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळवळा जात असल्याची गुप्त माहीती पोलिस पथकाला मिळाली. ऑनलाईन पध्दतीने हा क्रिकेट सट्टा घेतला जात असल्याचेही पोलिसांना कळले. पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली असता दोन व्यक्ती इंडियन प्रीमियर लीग (IPL20) च्या राजस्थान रॉयल व रॉयल चॉलेंज बंगलोर संघावार मोबाइल द्वारे सट्टा घेतांना आढळून आले. पोलिसांनी ऑनलाईन क्रिकेट सट्टा घेणाऱ्या सिद्धार्थ राजेंद्र दुगड (23) रा. साई नगर वरोरा, उदय रवींद्र काकडे (33) रा. बावणे ले-आऊट यांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्या कडुन 1 लाख 69 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने गुन्हा करण्यात आला आहे. 

सदर कार्यवाही मा. आयुष नोपानिउपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शनात पोनि दिपक खोब्रागडे यांचे अधिपत्यात सपोनि राजकिरण मडावी, सपोनि राहुल किटे, पोउपनि किशोर मित्तरवार, पोहवा दिलीप सूर, नापोशी किशोर बोढे, पोशी सुरज मेश्राम, पोशी कपिल भंडारवार, पोशी प्रवीण निकोडे यांनी केली.
वरोऱ्यात आयपीएल वर सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक, बावणे ले-आऊटात कारवाई वरोऱ्यात आयपीएल वर सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक, बावणे ले-आऊटात कारवाई Reviewed by सह्याद्री चौफेर on September 30, 2021 Rating: 5
Powered by Blogger.