शेतकऱ्यांनो 2021-22 पिक विमा काढलाय, मग जाणून घ्या "ह्या" अत्यंत महत्वाच्या सूचना


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (३० सप्टें.) :
चालु 2021-22 वर्षात खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना देण्यात आल्या आहे.

ज्या शेतकऱ्यांचे चक्रीवादळ किंवा अतिपावसामुळे किंवा पुराच्या पाण्यामुळे पिक नुकसान झाले असल्यास, शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीस टोल फ्री क्रमांकावर फोन करून किंवा ई-मेल करून किंवा क्रॉप इन्शुरन्स ऍपचा वापर करून, किंवा विमा कंपनीच्या कार्यालयात लेखी स्वरूपात कळवावे.
नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत तक्रार करावी. नाहीतर तक्रार मान्य होत नाही. त्यामुळे नुकसानीचा दिनांक आपण वापरत असलेल्या तक्रारीच्या माध्यमानुसार अचूक टाकावा किंवा सांगावा.

केळापूर तालुक्यातील पांढरकवडा येथे रॉय कॉम्प्लेक्स राहुल भवन जवळ गाळा क्र. 65 येथे कंपनीचे कार्यालय सुरू आहे. याकरिता विमा कंपनी कडून तक्रार करण्यासाठी चार पर्याय देण्यात आलेले आहेत. त्यानुसार आपली तक्रार नोंदवावी.

१) टोल फ्री नंबर :
 18001035499

२) ई-मेल ID- support@iffcotokio.co.in

३) ऍप वरून तक्रार करण्यासाठी लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central

🟢दरम्यान, ऍप वापरून तक्रार देतांना विमा पावती नंबर टाकणे आवश्यक आहे. तक्रार नोंद झाल्यानंतर मोबाईल वर येणाऱ्या "डॉकेट आय डी" चा स्क्रीन शॉट आवर्जून काढून ठेवा. या आय डी वरून आपल्या प्रकरणाची सद्यस्थिती पाहिजे तेंव्हा मोबाईल वर लगेच कळते. त्यामुळे ऍप चा वापर करून तक्रार करणे केंव्हाही फायदेशीर आहे. तसेच ऍप चा वापर करणे सोपे आहे.

ऍप वर माहिती भरताना पुढीलप्रमाणे भरता येईल :
• नुकसानीचे कारण - cyclone रेन (चक्रीवादळ) किंवा excess rainfall (अती पाऊस) यापैकी जे असेल ते नोंदवावे किंवा लिहावे.

• जर सोयाबीन पाण्यात उभे असेल तर standing crop असे दाखवावे किंवा नोंदवावे.

• जर सोयाबीन शेतात सोंगून सुडी न मारता पसर असेल तर cut & spread in bundles असे दाखवावे किंवा नोंदवावे.
🟢
• वर्ष 2021-22 असे लिहावे/नोंदवावे.


४) लेखी तक्रार : जर वरील तिन्ही पर्याय व्यवस्थित चालू नसतील तर, तालुका स्तरावर असलेल्या विमा कंपनीच्या कार्यालयात खालील कागदपत्रे सादर करावे.
 
१) विहित नमुन्यातील पीक नुकसान पूर्वसूचना अर्ज,
२) विमा पावती, 
३) विमा पावतीवर नोंदवल्या नुसार 7/12 व 8-अ
४) आधार कार्ड xerox व 
५) बँक पासबुक xerox
जोडुन पीक नुकसान तक्रार देऊन पोहोच (oc) आवर्जून घ्यावी. 
🟢तक्रार अर्जाचा नमुना विमा कंपनीच्या कार्यालयातुन माहिती करून घेऊन भरावा. अशी तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार पांढरकवढा यांनी दिली.

Previous Post Next Post