सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३०सप्टें.) : काल बुधवार दि.29 सप्टेंबरला "स्वर प्रीती कला अकादमी राजुरा" तर्फे स्वर प्रीतीच्या संस्थापक सदस्या स्व. पूजा सुनील देशपांडे यांच्या वाढदिवसा निमित्त प्रथम पुण्यतिथीचा श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. या शिवाय वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे पारिताेषिक वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सदरहु आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या जेष्ठ मागदर्शिका अधिवक्ता मेघा धाेटे यांची कन्या कु. ज्ञानदा रामकृष्ण धोटे हिने विद्यापीठ स्तरीय पुरस्कार प्राप्त केल्या बद्दल तिचा सहृदय सत्कार करण्यात आला. या वेळी स्वरूपा झंवर यांना देखिल सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला वंदनाताई चटप, दिलीप सदावर्ते (अध्यक्ष स्वरप्रिती कला अकादमी) अल्का सदावर्ते संयोजिका, विजय जांभूळकर जिल्हा (अध्यक्ष नफदो) रजनी शर्मा, वज्रमाला बतकमवार उपस्थित होते. अल्का सदावर्ते यांनी आपल्या प्रास्ताविकेतुन वर्षभर राबविण्यात आलेल्या स्पर्धांची व विविध उपक्रमांची माहिती दिली.
दिलीप सदावर्ते, विजय जांभुलकर,रजनी शर्मा यांची सुध्दा समयोचित भाषणे या वेळी झाली. कु.नेहा सुनिल देशपांडे हिने आपले भावनिक विचार व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या प्रसंगी शबाना शेख मॅडम यांनी गणेश वंदना आणि "कहां तुम चले गये "ही गीत गाऊन कार्यक्रमात वेगळीच रंगत भरली. स्पर्धा प्रमुख अल्का सदावर्ते, नम्रता खोंड, विणा देशकर, वर्षा वैद्य,वैशाली भोयर यांनी आई, आयुष्य, मैत्री, व बाबा या विषयावर चारोळी स्पर्धा घेतली होती.
कार्यक्रमाचे संचालन राजश्री उपगनलावार यांनी सुरेखपणे केले .तर उपस्थितीतांचे आभार संदीप कोंडेकार आणि ऍड .मेघा धोटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता छोटुलाल सोमलकर, शबाना शेख, माणिक उपलांचीवार, उमा देशपांडे, नंदिनी देशमुख, उज्वला जयपूरकर, सुनीता कुंभारे, वनमाला परसुटकर यांनी अथक परिश्रम घेतले.
स्वर प्रीतीचे उपक्रम प्रशंसानीय - वंदनाताई चटप
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 30, 2021
Rating:
