सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (०४ सप्टें.) : श्रावण मास लागतात सणवार, उत्सवाला सुरुवात होत असते. मागील दोन वर्षांपासून कोरोना ची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शासन निर्णयानुसार सर्वच सण, उत्सव अगदी साधेपणाने साजरी केली जात आहे. आता पोळा हा सण अगदी जवळ आला असून त्यापाठोपाठ गणपती आणि जेष्ठ गौरीचे आगमन होणार आहे. आगामी सण, उत्सवाच्या काळात पांढरकवडा शहर तसेच तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोखपणे हाताळत शांतता कायम राहील यासाठी पोलिस दलातील यंत्रणा सज्ज झाली आहे. सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये पथसंचलन करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत चपाईतकर, पोलिस उपनिरीक्षक संदीप बारंगे, पोलिस उपनिरीक्षक निलेश गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक हेमराज कोळी, पोलिस उपनिरीक्षक मदनसिंह चौहान, पोलिस उपनिरीक्षक अंजली कानबाले तसेच संपूर्ण पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.