सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (०५ सप्टें.) : चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून संपूर्ण विदर्भात औळखल्या जाताे. परंतु एवढ्या माेठ्या प्रमाणात या जिल्ह्यात उद्योग धंदे असुन सुध्दा स्थानिक बेराेजगारांच्या हातांना काम नाही ही खरी शाेकांतिका आहे. अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काेरपना तालुका अंतर्गत येत असलेल्या गांडेगाव, विरुर, पैनगंगा काेळसा खदानीत बाेरगांव येथील काही युवकांनी कंपनीत आम्हाला कामावर घ्या असे कंपनीला म्हटले. या बाबतीत अनेकदा त्यांनी पाठपुरावा देखील केला परंतु त्यांचे अथक प्रयत्नाला यश आले नाही. शेवटी तेथील बेराेजगारांनी प्रहारचे युवा नेते महेश हजारे यांची प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांना या बाबत माहिती दिली.
हजारे यांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता लगेच पैनगंगा काेळसा खदानीचे रेड्डी यांचेशी संपर्क साधला व दत्तक घेतलेल्या बाेरगांव येथील युवकांना कंपनीत कामावर घ्या अशी मागणी रेटुन धरली तदवतचं महेश हजारे यांनी नुकतेच एक लेखी निवेदन कंपनीला सादर केले. येत्या १५ सप्टेंबर पर्यंत दत्तक घेतलेल्या बाेरगांव मधील युवकांना कामावर न घेतल्यास कंपनीच्या प्रवेशव्दारा जवळ प्रहार जनपक्षाच्या माध्यमांतुन आंदोलन छेडण्यांचा इशारा पैनगंगा काेळसा खदान कंपनीला दिला असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, या प्रतिनिधीने प्रहारचे महेश हजारे यांची भेट घेतली असता दत्तक घेतलेल्या बाेरगांवातील एक ही युवकास या कंपनीने कामावर घेतले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्या गावातील युवकांची मागणी रास्त असल्याचे ते पुढे म्हणाले, बाेरगांव गावातील युवकांनाच या कंपनीत कामावर का घेत नाही असा सवालही महेश हजारे यांनी उपस्थित केला आहे.
पैनगंगा काेळसा खदानीत स्थानिक यूवकांना कामावर घ्या - अन्यथा आंदोलन करु महेश हजारेंचा इशारा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 05, 2021
Rating:
