खामलवाडी (तांडा) येथील पांदण रस्ता तात्काळ दुरुस्त करा - गोर सेनेचा तहसीलदारांना आंदोलनाचा इशारा

         
सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (१४ सप्टें.) : शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे सर्वजण गोडवे गातात. परंतु वास्तविक परिस्थिती ही वेगळीच आहे. कधी निसर्ग साथ देत नाही तर कधी शेतमालाचे भाव गडगडतात परंतु विविध समस्यांच्या विळख्यात असलेल्या महागाव तालुक्यातील खमलवाडी (तांडा) येथील शेत स.नं १६ /१ ते ३३/१ पर्यंत पांदण रस्त्याचे काम पालकमंत्री योजना अंतर्गत मातीकाम झालेला होता. नव्वद टक्के शेतकऱ्यांना ये-जा करण्याचा पांदण रस्ता ०७/९/२०२१ च्या जोरदार पावसाने पांदण रस्त्यात लोकवर्गणीतून बसवण्यात आलेले सिमेंट नळा वाहून गेलेला आहे. त्यामुळे नादुरुस्त नाल्यातून शेतकऱ्यांना शेतात जाणे अशक्य झाले आहे. खामलवाडी तांडा येतील शेतकरी शेतमजूर शेळी गुरंढोरं नाला ओलांडून जाऊ शकत नसल्याने तीन दिवसापासून घरातच बसलेले आहे. तरी संबंधित विभागाने शेतकऱ्यांची दशा लक्षात घेऊन त्वरित नाल्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा शेतकरी बांधव व गोर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच शेतकरी शेतमजूर शेळी बैलाची तेथून ये-जा करताना जीवित अथवा वित्तहानी झाल्यास स्थानिक शासन-प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा गोर सेनेचे तालुका अध्यक्ष आजेश जाधव यांनी दिला.

त्यावेळी गोर सेनेचे तालुका उपाध्यक्ष विकी आडे, सचिव समाधान राठोड, सर्कल अध्यक्ष संदीप चव्हाण, सर्कल उपाध्यक्ष संतोष राठोड, शाखा अध्यक्ष नितीन पवार आनंदनग, गजानन चव्हाण सरपंच खामलवाडी, शेतकरी संजय राठोड, सुरेश राठोड, गणेश पवार, देविदास पवार, विशाल राठोड, पूजा राठोड, मोतीराम राठोड, अविनाश राठोड, रवींद्र राठोड, वंदना राठोड, श्रीराम पवार अमरसींग राठोड, शंकर राठोड रामराव आडे, शेषेराव जाधव, भीमराव निरंजन राठोड, हरी पवार, प्रेमसिंग राठोड, शिवराम राठोड, गजानन राठोड, अंबादास राठोड, उमेश पवार, सुभाष पवार, जानू सिंग चव्हाण, सचिन राठोड, भीमराव राठोड व खामलवाडी येथील शेतकरी आणि गोर सेनेचे कार्यकर्ते हजर होते.
खामलवाडी (तांडा) येथील पांदण रस्ता तात्काळ दुरुस्त करा - गोर सेनेचा तहसीलदारांना आंदोलनाचा इशारा खामलवाडी (तांडा) येथील पांदण रस्ता तात्काळ दुरुस्त करा - गोर सेनेचा तहसीलदारांना आंदोलनाचा इशारा Reviewed by सह्याद्री चौफेर on September 14, 2021 Rating: 5
Powered by Blogger.