सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (०७ ऑगस्ट) : रोजगाराच्या वाटा कमी झाल्याने जिकडे तिकडेच बेरोजगारांच्या फौजा तयार होऊ लागल्या आहे. बेरोजगारीची समस्या अधिकच बिकट होऊ लागली असून रोजगार मिळत नसल्याने बेरोजगार युवक नैराशेच्या गर्तेत आले आहे. रोजगार मिळवून देण्याकरिता कोणीही पुढाकार घेत नसून निवडणूक काळात फक्त आश्वासने दिली जातात. बेरोजगार युवकांची रोजगाराकरिता भटकंती सुरु असून वणवण भटकुनही रोजगार मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.शैक्षणिक पात्रता धारण केलेले युवक रोजगाराच्या संधी शोधत आहे. पण त्यांनाही रोजगार मिळणे कठीण झाले आहे. ही बेरोजगारीची भीषणता लक्षात घेता काही सामाजिक व राजकीय संघटनांनी बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याकरिता पुढाकार घेतला आहे. ऍड. राजेंद्र महाडोळे यांच्या वाढदिवसानिमित्त ५ ऑगष्टला पांढरकवडा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. १००० बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्याकरिता गोपीनाथ मुंडे सभागृहात बेरोजगारांची नोंदणी करण्यात आली असून, शैक्षणिक पात्रतेनुसार विविध कंपन्यांमध्ये बेरोजगारांना लवकच रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ऍड. राजेंद्र महाडोळे यांनी यावेळी स्पष्ट केले. गोपीनाथ मुंडे सभागृहात आयोजित या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन ऍड महाडोळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्य्क्षस्थानी नगराध्यक्षा वैशाली नहाते होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून भोई समाज संघटनेच्या रंजनाताई पारशिवे, तेली समाज संघटनेचे रमेश गिटोलकर, आदिवासी गोवारी महासंघाचे सुभाष लसंते, गोवारी समाज संघटनेचे नंदूभाऊ नेहारे, अखिल भारतीय माळी महासंघ अमरावतीचे प्रविण पेडकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक म्हणून अमोल गुरनुले, राजेंद्र मांदाडे, विठ्ठलराव नागतोडे, राजेंद्र घाटे, गणेश राऊत, मनोज नहाते, प्रमोद राऊत यांनी जबाबदारी पार पाडली.
यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. शेतकऱ्यांचे तरुण मुलं बेरोजगार आहेत. रोजगारासाठी ते वणवण भटकत आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक कना पूर्ण तुटलेला आहे. आर्थिक परिवर्तनाची लढाई लढण्याचा संकल्प उराशी बांधून अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याकरिता पुढाकार घेत अनेक कंपण्यांशी संपर्क साधला. तसेच भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करून शैक्षणिक पात्रतेनुसार बेरोजगारांची नोंदणी करून घेतली. लवकरच नोंदणी झालेल्या बेरोजगार युवक युवतींना रोजगार प्राप्त करून देण्यात येणार असल्याचे ऍड राजेंद्र महाडोळे यांनी मेळाव्याच्या उद्घाटनपर भाषणातून स्पष्ट केले.
पांढरकवड्याच्या नगराध्यक्षा वैशाली नहाते यांनी रोजगार ही आज काळाची गरज असून बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याकरिता पुढाकार घेतल्याबद्दल ऍड. महाडोळे यांचे अभिनंदन करतांना रोजगार मेळाव्यात नोंदणी करणाऱ्यांना जास्तीतजास्त रोजगार प्राप्त व्हावा अशी आशा आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य केले.
एक हजार बेरोजगारांना निश्चितच रोजगार मिळवून देऊ, ऍड. राजेंद्र महाडोळे यांचा संकल्प !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 08, 2021
Rating:
