सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (१९ ऑगस्ट) : तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या आरोपवरून एका २२ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या घटनेची दीड महिन्यापूर्वी पोलिसात तक्रार देण्यात आली होती.
सराटी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर राळेगाव तालुक्यातील खैरगांव (जवादे) येथील सागर निवृत्ती मेश्राम (२२) नामक युवकाचे सूत जुळले, दुनियादारी की ऐसी तैसी करत, पळून जाण्याचा निर्णय घेतला, ठरलं आणि दोघांनी २० जुलै ला घरातून धूम ठोकली. घरची मंडळी सायंकाळी घरी आल्यावर मुलगी दिसत नसल्याने सगळीकडे शोध सुरु केला. नातेवाईक, संबधी यांना विचारपूस केल्या वर ही मुलगी आढळून न आल्याने शेवटी दि.२० जुलै ला घरच्यांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरु ठेवला. अशातच लॉकडाऊन आणि पाऊस फटका, यामुळे दोघेही रुंझा ता. केळापूर (पांढरकवडा) येथे असल्याची माहिती कळली. मारेगाव पोलिसांनी पांढरकवडा पोलिसांची मदत घेवून सापळा रचला व त्या दोघांना ताब्यात घेतले.
मुलीला तिच्या घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आले. तर आरोपीला जेल ची हवा खावी लागत आहे. त्याचेवर लग्नाचे आमिष दाखवणे, पळवून नेणे, लैंगिक अत्याचार करणे, यानुसार पोक्सो अंतर्गत ४,८ व कलम ३७६ (२), (J) (N), ३६६ (अ) कारवाई करण्यात आली. ही कारवाई मारेगावचे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार, राजेंद्र चांदेकर, विनय राठोड, अजय वाभिटकर, राजू टेकाम यांनी केली.
युवकाला पोलीसांनी ठोकल्या बेड्या, अल्पवयीनला पळवून नेणे पडले महागात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 19, 2021
Rating:
