जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा वनमाला ताईंच्या संकल्पनेतून वृक्षारोपण संपन्न

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (२८ ऑगस्ट) : दरवर्षी आमणी या गावात, शालेय परिसरात यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा वनमालाताई आवडीने वृक्षारोपण करत असतात. आजपण सहज मोजता न येण्याऐवढी झाडे आमणी या गावी बघायला मिळतात. ताईंचा नवनवीन झाडे लावण्याचा उत्साह व त्यात शालेय कर्मचाऱ्यांचा सदैव मिळणारा मदतपूर्ण सहभाग ह्यामुळे आमणी गावचे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलत जात. आज दि.२७ ऑगस्ट २०२१ रोजी ग्राम आमणी ते महागाव रोड ला व एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

येणाऱ्या पिढीस मुबलक ऑक्सिजन, फुल,फळ, व वाटसरुंसाठी थंडगार सावली मिळावी ह्या उद्देशातून वनमालाताई राठोड यांचे मार्गदर्शनाने व त्यांचे हस्ते रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करण्यात आले. कडुनिंब, करंज, चिंच, वड, बेहडा, बहावा, गुलमोहर ई. प्रकारच्या झाडांची रोपे लावण्यात आली.

वृक्षारोपण हे आमणी (बु) गावच्या सरपंच सौ.सुनीता सुनील राठोड, उपसरपंच श्री.संतोष राऊत, ग्रा.प सदस्य श्री.गोविंद राठोड, सौ.आशा वानखेडे, सौ.स्मिता जाधव, पंजाब कांबळे, शंकर चव्हाण य.जि.काँ.क सरचिटणीस सुनीलभाऊ राठोड, वैद्य.अ. रामराव पवार, सौ.जयमाला पवार, वनाधिकारी राठोड साहेब, गोहाडेजी, इंजि. गोपाल पवार, पांडू राऊत, समाधान जाधव, प्राथ.आ.शाळेचे मुख्याध्यापक राजू कावडे, मु'अ. जय वानखेडे, गोर अध्यक्ष बाळू राठोड, रुपेश सुरोशे, के. के.राठोड, प्रा. विनोद राठोड, अमोल पवार, इंदल पवार, अविनाश राठोड, अविनाश खंदारे, दिलीप राठोड, विवेक जाधव ह्या सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा वनमाला ताईंच्या संकल्पनेतून वृक्षारोपण संपन्न जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा वनमाला ताईंच्या संकल्पनेतून वृक्षारोपण संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on August 28, 2021 Rating: 5
Powered by Blogger.