सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (१३ ऑगस्ट) : मैत्रिणी बरोबर वाढदिवसाला गेलेली अल्पवयीन मुलगी घरी न पोहचता वाटेतूनच बेपत्ता झाल्याची घटना काल १२ ऑगस्टला उघडकीस आली. तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा मुलीच्या वडिलांचा संशय असून तशी तक्रारही वडिलांनी पोलिस स्टेशनला नोंदविली आहे. मैत्रिणीने तिला घर संसार सेल जवळ सोडल्यानंतर ती अचानक तेथून बेपत्ता झाली. अज्ञाताने संधी साधून तिला पळवून नेल्याचा दाट संशय व्यक्त केल्या जात आहे. नुकताच राजूर (कॉ) येथील अल्पवयीन मुलीच्या पळवणूक प्रकरणाचा छडा लागत नाही तोच शहरातील आणखी एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडल्याने पोलिसांसमोर परत मुलीचा व अज्ञात आरोपीचा शोध लावण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.
शहरातील रंगारीपुरा परिसरातील अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणी सोबत वाढदिवसाला जातो म्हणून घराबाहेर पडली ती घरी परतलीच नाही. मैत्रिणीने तिला घर संसार सेल पर्यंत सोबत दिली. नंतर ती अचानक कुठे बेपत्ता झाली हे मैत्रिणीलाही कळेनासे झाले. तिला बेत आखून अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय व्यक्त होत असून तशी तक्रारही मुलीच्या वडिलांनी पोलिस स्टेशनला नोंदविली आहे. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि च्या कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मजूर कुटुंबातील अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना फूस लावून पळवून नेण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. कोवळ्या वयातील मुलींचं आयुष्य उध्वस्त करून त्यांच्यावर अकाली सांसाराचं ओझं लादल्या जात आहे. प्रलोभनाला प्रेम व क्षणिक सहवासाला जीवन समजून अल्पवयीन मुली या भामट्यांच्या नांदी लागून आपल्या जीवनाची राखरांगोळी करून घेत आहे. अल्पवयीन मुलींचा पिच्छा पुरवून त्यांना मोहात पाडण्याचा काही सडकछाप मजनूंचा दिनक्रमचं झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यांच्या आता वेळीच मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे. बेपत्ता मुलीचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय माया चाटसे करित आहे.
मैत्रिणी सोबत वाढदिवसाला गेलेली अल्पवयीन मुलगी वाटेतूनच झाली बेपत्ता
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 13, 2021
Rating:
