बावलगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (१३ ऑगस्ट) : मौजे बावलगाव ता.बिलोली येथे पुण्यश्लोक, राजमाता, लोकमाता महाराणी आहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त देगलूर/ बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मा. सुभाष साबणे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले। तसेच शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री उद्धवजी ठाकरे साहेब ह्यांनी जाहीर केलेल्या शिवसंपर्क अभियान मार्फत लोकांशी संपर्क वाढवणे तसेच गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक या माध्यमातून जनते पर्यंत पोहचवणे हे मा.आमदार सुभाषराव साबणे साहेब यांच्या उपस्थित सुरु झाले आहे व राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखे तर्फे महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट संसदपटू" या पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल मा.आमदार सुभाषराव साबणे साहेब यांचा गावकऱ्या तर्फे सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित शिवसेना बिलोली तालुका प्रमुख बाबाराव रोकडे पाटील, सदाशिव पाटील आरळीकर (सरपंच आरळी),मार्तंड जेठे  (पत्रकार), गंगाधर पाटील, राजु मदनूरे, दत्ता पाटील, रमेश छपेवार (उपसरपंच) व शिवसेना युवासेना पदाधिकारी व गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.