सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (१३ ऑगस्ट) : फुलसावंगी येथील रेंजो उर्फ मुन्ना ह्या प्रयोगशील तरुणाचा अपघाती निधन झाला होता.त्याच्या कुटूंबाच्या सांत्वन करण्यासाठी आज शुक्रवारी भारतीय जनता पार्टी यवतमाळ चे जिल्हा अध्यक्ष नितीन भूतडा यांनी भेट दिली व कुटूंबाला तातळीने पाच लाख रुपये मदतीची या वेळी त्यांनी घोषणा केली.
फुलसावंगी येथील शेख इस्माईल शेख इब्राहिम उर्फ मुन्ना व सध्या 'मुन्ना हेलिकॉप्टर' या टोपण नावाने ओळखले जाणाऱ्या प्रयोगशील तरुणाने हेलिकॉप्टर निर्मिती केली होती. हा प्रयोग यशस्वी करून तो हेलिकॉप्टर तो इयर अबुलन्स किंवा शेती साठी फवारणी यंत्र म्हणून वापरण्याचे त्याचे स्वप्न होते. उपचारात लागत असलेल्या वेळे मुळे कोणाचे ही जीव जाऊ नये असे त्याचे त्या मागे उदात्त हेतू होता पण तो यशस्वी झाले नाही व तो त्या हेलिकॉप्टर ची चाचणी घेतांना अपघाती निधन झाले. या अपघाताने केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर देशाचे नुकसान झाले आहे. त्याच्या निधनानंतर अनेक नेते फुलसावंगी येथे मुन्ना च्या कुटूंबाला भेट देत आहेत. आज शुक्रवारी भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन भूतडा, आमदार ऍड निलय नाईक, आमदार नामदेव ससाणे यांनी भेट दिली यावेळी भाजपा यवतमाळ च्या वतीने मुन्ना च्या कुटूंबाला पाच लाख रुपये आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली.
जिल्हा भाजपा आली 'मुन्ना'च्या कुटुंबासाठी धावून;पाच लाख रुपये मदतीची घोषणा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 13, 2021
Rating:
