नरेगातुन 'ग्राम समृध्दी बुध्दीमंथन' कार्यशाळा कळंब येथे सपन्न

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख 
कळंब, (०२ ऑगस्ट) : सरस्वती बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ राळेगांव यांच्या व्दारा कळंब पंचायत समिती हॉल मध्ये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पदमाकर मडावी यांच्या अध्यक्षते खाली "मनरेगातुन ग्रामसमृध्दी" बुध्दीमंथन कार्यशाळा सपन्न झाली.

या कार्यशाळेत मनरेगाचे नियोजन, कामाचा आढावा, बजेट, मजुराचे ताळेबंद, याबाबत तसेच मनरेगातुन २६२ प्रकारचे कामे आपण आपल्या गावात सुरू करु शकतो या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्य शाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन वरोरा येथील श्री किशोर चौधरी अध्यक्ष विचार विकास संस्था, तर उदघाटक म्हणुन सामाजिक कार्यकर्ते अशोक उमरतकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन उपसभापती विलास राठोड, पं. स.सदस्य महादेवराव काळे, रूस्तम शेख, देवेंद्र पडोळकर सहा. कार्यक्रम अधिकारी नरेगा पं.स.कळंब सहा गट विकास अधिकारी तुषार महाजन, आशिष कुंभारे, विस्तार अधिकारी धर्माळे, दिगांबर गाडगे इ. मान्यवर उपास्थित होते.

बुद्धीमंथन कार्यशाळेचे सुत्रसंचालन प्रमोद कांबळे, प्रास्ताविक गंगाधरराव घोटेकार, तर आभार प्रदर्शन जयानंद टेभेंकर यांनी केले.
कार्यशाळा यशस्वी होण्याकरीता प्रदिप कोरडे, स्वप्नील घोटेकार, महेंद्र धुर्वे इ.अथक परिश्रम घेतले.
या प्रसंगी तालुक्यातील बहुसंख्य सरपंच, उपसरपंच, रोजगार सेवक उपस्थित होते.
नरेगातुन 'ग्राम समृध्दी बुध्दीमंथन' कार्यशाळा कळंब येथे सपन्न नरेगातुन 'ग्राम समृध्दी बुध्दीमंथन' कार्यशाळा कळंब येथे सपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on August 02, 2021 Rating: 5
Powered by Blogger.