रॉयल फाऊंडेशनच्या कार्यालयीन फलकाचे उद्घाटन

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०२ ऑगस्ट) : सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या रॉयल फाऊंडेशन संस्थेच्या कार्यालयीन फलकाचे ३१ जुलैला वणी येथील बिल्डर डेव्हलपर्स व उद्योजक मनीष चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मनीष चौधरी यांनी ६५ हजार रुपये किमतीचे ऑक्सिजन काँसंट्रेटर रॉयल फाऊंडेशन संस्थेला भेट म्हणून दिले. तसेच संस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक समाज उपयोगी कार्य व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करत संस्थेच्या पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.

यावेळी ऍड. निलेश चौधरी व डॉ. रोहित वनकर यांनी समाजाप्रती असलेल्या सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याकरिता रॉयल फाऊंडेशन ही संस्था सुरु करण्यात येत असून, नुकताच या संस्थेचा लोगो प्रकाशित करण्यात आला असल्याचे सांगितले. लवकरच संस्थेची वणी, पांढरकवडा व राळेगाव शहराची कार्यकारणी गठीत करण्यात येणार असून संस्थेच्या कामकाजाला मात्र, सुरुवात करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
(ऑक्सिजन काँसंट्रेटर रॉयल फाऊंडेशन संस्थेला भेट देताना)

संस्थेच्या यशस्वी वाटचाली करिता सामान्य जनतेची साथ व सहकार्य आवश्यक असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला वर्षा कचवे, निकुंज अटारा, सागर वंजारी, अजय टोंगे, ललित कचवे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
रॉयल फाऊंडेशनच्या कार्यालयीन फलकाचे उद्घाटन रॉयल फाऊंडेशनच्या कार्यालयीन फलकाचे उद्घाटन Reviewed by सह्याद्री चौफेर on August 02, 2021 Rating: 5
Powered by Blogger.