आरोपीस अटक : पोक्सो सह विनयभंगाचा गुन्हा दाखल


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (१४ ऑगस्ट) : तालुक्यातील हिवरी येथील २६ वर्षीय युवकाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची खळबळ जनक घटना हिवरी येथे घडली. ईश्वर कवडू आस्वले (२६) असे नराधम आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार पीडित ही १३ ऑगस्ट रोजी ८ वाजताच्या दरम्यान किराणा दुकानात सामान घेण्याकरिता जात होती. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत आरोपी पीडितेच्या मागून आला आणि १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून उचलले व बैलाच्या गोठ्यात नेले. दरम्यान पीडितीने विरोध करत आरडा ओरड करत आरोपीच्या हाताला झटका मारला व मोठमोठ्यांनी ओरडू लागली. दरम्यान पीडितेच्या वडिलांसह घर शेजारी ग्रामस्थांनी घटना स्थळी धाव घेतली. तेव्हा आरोपी ईश्वर गोठ्यातील तुराठीची गंजी वाकवून पसार झाला.
घटनेच्या दिवशी रात्र झाल्याने तसेच तालुक्याला जाण्यासाठी वाहन न मिळाल्याने पीडितेच्या वडिलांनी दुसऱ्या दिवशी १४ ऑगस्ट रोजी ११ वाजता थेट पोलिस गाठून आरोपी विरोधात रिपोर्ट दिला असता, पीडितेच्या बयानवरून आरोपी कवडू ईश्वर आस्वाले यांचे भांदवी कलम ३५४,३५४-अ सह कलम ८,१२ बाल लैंगिक अत्याचार कायद्या अंतर्गत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.
मारेगाव पोलिसांनी विलंब न करता आरोपीला त्याच्या घरून तात्काळ अटक केली. पुढील तपास ठाणेदार जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक अमोल चौधरी जमादार आनंद आचलेवर करीत आहे.
आरोपीस अटक : पोक्सो सह विनयभंगाचा गुन्हा दाखल आरोपीस अटक : पोक्सो सह विनयभंगाचा गुन्हा दाखल Reviewed by सह्याद्री चौफेर on August 14, 2021 Rating: 5
Powered by Blogger.