सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२१ ऑगस्ट) : गोवंश जनावरांची अवैधरित्या खरेदी विक्री करून त्यांची कत्तल केली जात असल्याचे अनेक प्रकरणं समोर आले आहेत. गोवंश जनावरांची तस्करी करून त्यांची कत्तली करिता विक्री करण्याचा गोरखधंदा शहरात चांगलाच फोफावला आहे. गोवंश जनावरांच्या अवैध खरेदी विक्रीतून मोठा आर्थिक लाभ मिळत असल्याने अनेक जण या धंद्यात उतरले आहेत. गोवंश जनावरांच्या खरेदी विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचेही समजते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मागील काही दिवसांत अनेक गोवंश जनावरांची तस्करांच्या तावडीतून मुक्तता करण्यात आली आहे. गोवंश जनावरांची अवैधरित्या खरेदी विक्री करणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळून अनेक गोवंश जनावरांच्या कत्तली होण्यापासून वाचविले आहे. गोमांस विकणाऱ्यांवरही पोलिसांनी धाडी टाकून त्यांना ताब्यात घेतले आहे. गोवंश जनावरांची अवैधरित्या खरेदी विक्री करणारे तसेच त्यांची कत्तल करून त्यांचे मांस विकणारे पोलिसांच्या रडारावर असून पोलिस त्यांच्यावर बारीक नजर ठेऊन आहेत. काल १९ ऑगष्टला अशाच एका मिळालेल्या गुप्त माहिती वरून पोलिसांनी खडबडा मोहल्ला येथे धाड टाकून कत्तल करण्यात येणाऱ्या २७ गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्यांच्या तावडीतून मुक्तता केली आहे. तसेच गोवंश जनावरांची अवैधरित्या खरेदी विक्री करणाऱ्या तिन आरोपींना अटक केली आहे. काल १९ ऑगष्टला मोहरम निमित्त शहरात पोलिस बंदोबस्त ठेऊन गस्त घालणाऱ्या डीबी पथकाला खडबडा मोहल्ला येथे चारापाण्याची व्यवस्था न करता निर्दयीपणे जनावरांना बांधून ठेवले असल्याची विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळाली. माहितीच्या आधारे डीबी पथकाने खडबडा मोहल्ला येथे सापळा रचून जनावरे असलेल्या ठिकाणाची पाहणी केली असता अत्यंत निर्दयीपणे गोवंश जनावरांना दोरीने बांधून त्यांच्या चारापाण्याची व्यवस्थाही केली नसल्याचे आढळले. त्याठिकाणी पोलिसांना २७ गोवंश जनावरे आढळून आली. अतिशय क्रूरतेने त्या जनावरांना दोराने बांधून त्यांच्या चारापाण्याचीही व्यवस्था करण्यात न आल्याने त्यांची कत्तल केली जाणार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. गोवंश जनावरांना निर्दयीपणे वागवून त्यांची अवैधरित्या कत्तल करण्याचा आरोपींचा डाव हाणून पाडत पोलिसांनी २७ गोवंश जनावरांची त्यांच्या तावडीतून मुक्तता केली. याआधीही पोलिसांनी तत्परता दाखवत कत्तली करिता गोवंशाची खरेदी विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून गोवंश जनावरांची कत्तल होण्यापासून वाचविले आहे. तसेच गोमांस विक्री करणाऱ्यांनाही जेरबंद करण्यात आले आहे. खडबडा मोहल्ला येथे टाकलेल्या धाडीत पोलिसांनी २७ गोवंश जनावरे किंमत २ लाख ७२ हजार रुपये एवढा मुद्देमाल जप्त केला असून राजू मधुकर झिलपे (२५) रा. खडबडा मोहल्ला, इलियास मुमताज अली खान (३९) रा. गोकुलनगर व शाहरुख खान लैलाब खान (२८) रा. खडबडा मोहल्ला या तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या कलम ५(अ), ९, प्राण्यांचा छळ अधिनियम १९६० च्या कलम ११(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनावरांना गुरुमाऊली गौरक्षण रासा येथे सोडण्यात आले आहे.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अशोक टेकाडे, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, दीपक वांड्रसवार, मिथुन राऊत, संजय शेंद्रे, यांनी केली. पुढील तपास जमादार डोमाजी भादीकर करित आहे.
कत्तल करण्यात येणाऱ्या २७ गोवंश जनावरांची पोलिसांनी केली मुक्तता
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 21, 2021
Rating:
