भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या 'सचिव' पदी अनिल डोंगरे यांची निवड

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
चंद्रपूर, (०४ ऑगस्ट) : भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या सचिव पदी श्री. अनिल डोंगरे यांची नुकतीच निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी असतांना उत्तम कार्य व गट ग्रा. विचोडा ग्रामपंचायतीवर तिसऱ्यांदा सरपंच उपसरपंच पदाची धुरा व भाजपचा गड राखला व गावाचा चौफेर विकास साधून पक्षाचा विश्वास, प्रेम संपादित करून युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केलं. यात सिंहाचा वाटा म्हणून अनिल डोंगरे यांची निवड करण्यात आली.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्ष पदी असतांना वेळोवेळी स्वखर्चाने अनेक कामं करून मदतीचा हात पुढे म्हणून अनिल डोंगरे परिचित आहे. कोरोना काळात समाजपयोगी उपक्रम राबवून अनेकांची मने जिंकली आहे. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा च्या प्रदेश कार्यकारिणी मध्ये 'सचिव' पदी निवड झाल्याबद्दल राज्याचे विधीमंडळ लोकलेखा समिती तथा माजी कॅबिनेट मंत्री,महाराष्ट्र मा. आ. सुधीर भाऊ मुनगंटीवर व प्रदेश अध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. युवकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी या पदाच्या माध्यमातून आपणावर जबाबदारी आली असून, आपण आपल्या संघटन कौशल्याचा बळावर या पदाला योग्य न्याय द्याल व भारतीय जनता पार्टीची प्रतिमा जनमाणसात अधिक ओजस्वी कराल याचा पूर्ण पार्टीला विश्वास आहे. आपल्या नव्या जबाबदारीच्या यशस्वीतेसाठी आपणास शुभेच्छा..! 
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या 'सचिव' पदी अनिल डोंगरे यांची निवड भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या 'सचिव' पदी अनिल डोंगरे यांची निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on August 04, 2021 Rating: 5
Powered by Blogger.