करंजखेड (तांडा) येथे तीज महाउत्सव साजरा

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (३१ ऑगस्ट) : तीज हा उत्सव म्हणजे बंजारा समाजाची दिवाळीच. बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे सर्व पदर आणि पैलू उलगडणारा उत्सव म्हणजेच तीज. मुळात बंजारा समाजातील तीज उत्सव दहा दिवस साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील राखी पौर्णिमेपासून त्यांच्या तीज उत्सवाला सुरुवात होते.

करंजखेड तांडा येथे बंजारा समाजाचा सण खास करून मुलींच्या वतीने दहा दिवसाचा तीज महोत्सव मोठ्या संख्येने साजरा केला जाते. यावेळी उपस्थित करंजखेड तांड्याचे नायक रामधन राठोड, कारभारी भरोस चव्हाण व राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोर बाळूभाऊ राठोड, पुनाजी जाधव, बाचु राठोड व तालुकाध्यक्ष आर बीपी सुनील प्रकाश राठोड, मनोहर चव्हाण, प्रसराम राजू राठोड, बबन चव्हाण, रामलाल चव्हाण, सूर्यभान राठोड, तानाजी राठोड, करण चव्हाण, सुनील चव्हाण, नरेंद्र आडे, निलेश राठोड, गोकुळ कृष्णा बलवान, विजय चव्हाण, विक्रम राठोड, रामेश्वर पवार, हे हजर होते.

तसेच बंजारा समाजाच्या ज्येष्ठ महिला मंडळी धुरपताबाई रामधन राठोड, कमलाबाई लक्ष्मण चव्हाण, जिजाबाई विश्राम चव्हाण, रंजना ताई गोर बाळूभाऊ राठोड, विमलाबाई बळीराम राठोड, धानी बाई सकरू जाधव, कमलाबाई परसराम जाधव, बेबीबाई जानसिंग जाधव, मंदाबाई बबन चव्हाण, सिंधुबाई सुदाम चव्हाण, शोभाबाई नंदु चव्हाण, सुनिता लव राठोड व सर्व बंजारा समाज मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.  
करंजखेड (तांडा) येथे तीज महाउत्सव साजरा करंजखेड (तांडा) येथे तीज महाउत्सव साजरा Reviewed by सह्याद्री चौफेर on August 31, 2021 Rating: 5
Powered by Blogger.