टॉप बातम्या

हिवरा येथे जागतिक आदिवासी दिन साजरा उत्साहात साजरा


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागाव, (१० ऑगस्ट : दिनांक ०९ ऑगस्ट २०२१ रोजी तालुक्यातील हिवरा (संगम) येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी जननायक, उलगुलान चे प्रणेते क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आधारस्तंभ साहेबराव पाटील मित्र परिवार व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आदिवासी जनानायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी येथील पोलीस पाटील प्रवीण कदम, राजेंद्र कदम, माधवराव बोरूळकर, दिपक कदम, सुनिल जाधव, अविनाश कदम, पत्रकार महेश कामारकर, शिवचरण आंडगे, दिलीप पोटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस गजेंद्र जामकर, तालुकाउपाध्यक्ष अमोल ठाकरे, शाखाध्यक्ष अभिजित कदम, किरण काळे, दिपक बहिरमकर,अविनाश ठाकरे आधारस्तंभ साहेबराव पाटील मित्र परिवाराचे संजय सोनुने उपस्थित होते.
Previous Post Next Post