माथार्जून येथे विश्व आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
झरी, (१० ऑगस्ट) : दि. ९ ऑगष्ट ला 'विश्व आदिवासी दिन' म्हणून हा जगभर साजरा केला जाते. या दिनाचे औचित्य साधून आदिवासी गौरव दिन मौजा माथार्जून येथे साजरा करण्यात आला. प्रथम जननायक बिरसा मुंडा, क्रांतीवीर शामा दादा, वीर बाबुराव शेडमाके या महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण व विनम्र अभिवादन करण्यात आले. 

यावेळी जागतिक आदिवासी गौरव दिन मोठया उत्सहात साजरा करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून गोंड, कोलाम पंच कमेंटी प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी जागतिक आदिवासी दिनानिमित्त माजी सरपंच बाबूलाला किनाके यांनी आपल्या महापुरुषांच्या कार्याचा इतिहास युवकांना परिचय करून दिला.

युवा संघटक व सामाजिक कार्यकर्ता म्हणून योगेश भाऊ मडावी यांनी या विश्व आदिवासी गौरव दिवस कार्यक्रमाच्या निमित्ताने युवकांशी संवाद साधला व सगा गणांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानू मेश्राम सर,  अजय मेश्राम सर यांनी केले. तर विलास किनाके सर, राजू सिडाम सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या निमित्ताने शामा दादा वाढोडकर चौकात वाचनालय उदघाट्नाचा कार्यक्रम आयोजित केला होता. 
माथार्जून येथे विश्व आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा माथार्जून येथे विश्व आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा Reviewed by सह्याद्री चौफेर on August 10, 2021 Rating: 5
Powered by Blogger.