टॉप बातम्या

वेगळ्या विदर्भासाठी चंद्रपूरात रस्ता राेकाे आंदोलन - आंदाेलनात अनेक कार्यकर्ते सहभागी !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२६ ऑगस्ट) : आज गुरुवार दि.२६ ऑगस्ट ला   वर्दळीच्या मुख्य पडोली चौक परिसरातील हायवे रोडवर विदर्भ राज्य आंदोलन समिती, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने रस्ता राेकाे आंदोलन सकाळी करण्यांत आले.

या आंदाेलनाचे नेत्रूत्व जिल्हाध्यक्ष किशोर दहेकर, कार्याध्यक्ष योगेश मुरेकर, व उपाध्यक्ष मुन्ना आवळे यांनी केले. विदर्भ राज्याची मागणी ११६ वर्ष उलटून गेली पण सत्तेतील सरकारने स्वतंत्र राज्य निर्माण केले नाही. विदर्भातील जनतेचा सरकारने विश्वास घात केला असून, ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली ९ ऑगस्ट व १५ ऑगस्टला शहीद चौक इतवारी नागपूर येथे स्वतंत्र विदर्भ राज्यचा जागर करून आंदाेलनाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला.

आज गुरुवार दि.२६ ऑगस्ट हा या आंदोलनाचा दुसरा टप्पा हाेता. यात वेगळा विदर्भाची निर्मिती झाली पाहिजे, कोरोना काळातील वीज बिल सरकारने भरावे, २०० युनिट वीज बिल माफ करून, त्यानंतर चे युनिट दर निम्मे करून विज बिल देण्यात यावे पेट्रोल, डिझेल, गॅस, दरवाढ कमी करण्यात यावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोग ऐवजी विदर्भ लोक सेवा आयोग स्थापन करण्यात यावा, विदर्भाच्या तरूणांना नोकऱ्यात २३ टक्के वाटा देण्यात यावा, नोकर भरती त्वरीत सुरू करावी, सर्प दंशाने मृत्यू पावल्यास चार लाख रुपये देण्यात यावे आदीं मागण्यांचा समावेश हाेता.
दरम्यान, या आंदोलनात अविनाश उके, ईश्वर सहारे, अंकुश वाघमारे, मुन्ना खोब्रागडे, नागसेन खंदारे, अनिल दिकोंडवार, पुंडलिकराव गोटे, आनंद मंगलवार, नथमल स्वामी यांचेसह अन्य पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.
Previous Post Next Post