सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मारेगाव, (०३ ऑगस्ट) : तालुक्यातील मार्डी ते नांदेपेरा या लोकल महामार्गाचे काम सुरु आहे. मात्र, पावसाळा लागताच या रस्त्याला ठिकठिकाणी भेगा पडल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे हा नवा कोरा रस्ता पुढे टिकेल की नाही, अशी चर्चा नागरिकात होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मार्डी ते मच्छिन्द्रा रस्त्यांची नुसती दगडूग्गी करून भागवणे चालू होते. परंतु आता नवा कोरा कायमचा दूपदरी रस्ता होत असून, काम सुरु आहे. परंतु कामाचा दर्जा पाहिजे तसा दिसत नाही. असे या मार्गाने प्रवास करणारे तसेच स्थानिक नागरिकातून बोलले जात आहे. एकीकडे काम सुरु आहे तर दुसरीकडे या नव्या कोऱ्या रस्त्याला ठिकठिकाणी भेगा पडत आहे. तर काही ओढ्यावरील बांधलेल्या पुलावरील जागा खाली दबत आहे. नवीन काम इतक्या लवकर दर्जा दाखवत असेल तर मग संबंधित विभाग यांचे लक्ष आहे कुठे असा ही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
वणी, नांदेपेरा, मार्डी ते वडकी हा मार्ग प्रवासासाठी आतिशय फायद्याचा असल्याचे मानले जाते. तसेच या रस्त्याने फार पूर्वीपासून लांबलांबची दुकाचीस्वार, ट्रॅक्टर, मोठं मोठे जड वाहन, तर ट्रक हे इंधन वाचवण्यासाठी, आणि टोल ची भानगड नसल्याने वाहन स्वार या मार्गाने येरजाऱ्या करतात. शिवाय या मार्गाने आता वाहतूक चांगलीच वाढल्याचे दिसून येत असल्याने हा रस्ता दर्जेदार बांधणे हे तितकेच आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागाने वेळोवेळी लक्ष घालून तसेच या रस्त्यांची त्यांच्या देखरेखीतून व्हावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
नव्या कोऱ्या रस्त्याला पडल्या भेगा; संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 03, 2021
Rating:
