बोरगडी ग्रामपंचायतचे पॅनलप्रमुख ओंकार शिंदे यांचा पंचायत समितीच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
यवतमाळ, (१६ जुलै) : पुसद तालुक्यातील
बोरगडी ग्रामपंचायतच्या सदस्य यांच्या घरी शौचालय बांधलेले व वापरात आहे का? किंवा नाही, याबाबत माहिती देण्यात यावी अशा आशयाचे अर्ज नागरिकांनी केला होता.

मात्र, माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे बोरगडी ग्रामपंचायतचे पॅनलप्रमुख ओंकार शिंदे यांनी पंचायत समितीच्या वरिष्ठांशी संपर्क साधून याबाबत माहिती देण्यात यावी अशी विनंती केली. मात्र, तरीही माहिती न मिळाल्यामुळे पॅनलप्रमुख ओंकार शिंदे यांनी पंचायत समितीची आमसभा सुरू असतांना अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उपस्थित्यांची चांगलीच धांदल उडाली.
बोरगडी ग्रामपंचायतचे पॅनलप्रमुख ओंकार शिंदे यांचा पंचायत समितीच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न बोरगडी ग्रामपंचायतचे पॅनलप्रमुख ओंकार शिंदे यांचा पंचायत समितीच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न Reviewed by सह्याद्री चौफेर on July 16, 2021 Rating: 5
Powered by Blogger.