ग्रामसंवाद सरपंच संघाची तालुका कार्यकारणी गठीत अध्यक्षपदी अजय कौरासे तर सचिवपदी हेमंत गौरकर यांची निवड
सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी, (१० जुलै) : महाराष्ट्र राज्य ग्रामसंवाद सरपंच संघाची वणी तालुका कार्यकारणी आज ता. १० जुलै रोजी स्थानिक विश्राम गृहात जिल्हाध्यक्ष विठ्ठल आडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत घोषित करण्यात आली.
यामध्ये ढाकोरी ग्रा.पं.चे सरपंच अजय कौरासे तर सचिवपदी खांदला ग्रा. पं. चे सरपंच हेमंत गौरकर यांची निवड करण्यात आली आहे.
या आयोजित बैठकीला कार्याध्यक्ष बापूराव पवार, मार्गदर्शक म्हणून ऍड. देवा पाचभाई, प्रशिक्षक म्हणून मारोती पाचभाई, संतोष आस्वले, तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोयर उपस्थित होते. यावेळी सर्वांनी ग्राम पंचायत समस्या व कामकाज संदर्भात मारदर्शन केले. तर ग्रामसंवाद सरपंच संघाची पुढील कार्यकारणी घोषित करण्यात आली.
यात तालुका उपाध्यक्ष म्हणून माथोली ऍड. आशिष मडावी, नेरड ग्रा. पं. चे सरपंच सौ. सुवर्णा विठ्ठल जुनगरी, कुंभरखानी ग्रा. पं. सरपंच सौ मंगला टेकाम, सरचिटणीस म्हणून कोळगाव ग्रा.पं. सरपंच गणेश जनेकर, लालगुडा ग्रा.पं. उपसरपंच निलेश कोरवते, नांदेपेरा ग्रा.पं. सदस्य राकेश खानकार, शिवानी ग्रा. पं. सरपंच स्वाती राजूरकर, तर तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून कोणा ग्रा.पं. सदस्य नितीन तुरणकार, तालुका शोषल मीडिया प्रमुख म्हणून शिरपूर ग्रा.पं. सरपंच जगदीश बोरपे, तर सदस्य म्हणून म्हणकालपुर ग्रा.पं. सरपंच नीलिमा बोन्डे, चनाखा ग्रा.पं. उपसरपंच शुभम मत्ते, वडगाव ग्रा.पं. सरपंच सौ. अर्चना प्रमोद डाखरे यांची निवड करण्यात आली.
ग्रामसंवाद सरपंच संघाची तालुका कार्यकारणी गठीत अध्यक्षपदी अजय कौरासे तर सचिवपदी हेमंत गौरकर यांची निवड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 10, 2021
Rating:
