निगंनुर (नागेशवाडी) येथे बोरवेलमधून गरम पाणी

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
उमरखेड, (२३ जुलै) : तालुक्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळखले जाणारे निगंनुर येथील नागेशवाडी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील अंबोडा येथे घटना पहायला मिळाली. तर आता दुसरी घटना उमरखेड तालुक्यातील निगंनुर नागेशवाडी येथील बोरवेलमधून गरम पाणी निघत असल्याची चर्चा सुरू असतांना तोच प्रकार तालुक्यातील निगंनुर येथे उघडकीला आली आहे. या अजब प्रकाचे आश्चर्य वाटत असून, गावाकऱ्यामध्ये भितीचे वातावरण पसरलेले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागांव सह उमरखेड तालुक्यात मागील आठवड्यात भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते, अशातच उमरखेड तालुक्यातील निगंनुर नागेशवाडी गावात एका बोरवेलमधून गरम पाणी येत आसल्याची चर्चा पसरली आहे. यामुळे भुकंप झाल्यावर बोरवेलमधून निघनारे गरम पाण्याची चर्चाचा विषय झाला आहे. अशातच हा प्रकार नागरिकासमोर आल्याने गावकऱ्यांनी भिंती व्यक्त केली आहे.

येथील बोरवेल मालक बळीराम अमरसिंग राठोड यांनी सन २०१४ मध्ये बोरवेल खोदला होता त्यांनी अपल्या राहात्या घरी म्हणजे अंगनात बोरवेल खोदले होते हा बोरवेल १२० फुट खोल आसल्याचे घरमालकाने सांगितले आहे या घटनेचा प्रकार तिन महिण्या पासून चालू आहे गरम पाणी निघत आहे सुरुवातीला कमी प्रमाणात पाणी गरम निघत होते आता जास्त प्रमाणात गरम पाणी निघत आहे या विषयी फोन दव्हारे तलाठी यांना सांगितले आहे तरी, तलाठी यांनी घटनास्थळी भेट सुद्धा दिली नाही असे माजी उपसरपंच अंकुश राठोड यांनी सांगितले.
निगंनुर (नागेशवाडी) येथे बोरवेलमधून गरम पाणी निगंनुर (नागेशवाडी) येथे बोरवेलमधून गरम पाणी Reviewed by सह्याद्री चौफेर on July 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.