टॉप बातम्या

मारेगाव पोलीस ठाण्यात अपघाती डिटेन वाहनांचा होणार लिलाव

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मारेगाव, (२३ जुलै) : गेल्या वर्षापासून मारेगाव पोलिस ठाण्यात अपघातातील  डिटेन 56 वाहनांचा लिलाव होत आहे.
पोलिस ठाण्यात विविध अपघातात (vehicles detained) वाहनांना ताब्यात घेण्यात आले होते, त्यावेळी मालकांनी या वाहनांबाबत कोणत्याही वाहनावर आपला दावा सिद्ध केलेला नाही.

पोलिस स्टेशनच्या माहिती यादीतील नाव पाहिल्यानंतर आणि कागदपत्रे दाखविल्यानंतर वाहन मालक ३ ऑगस्ट पर्यंत वाहन घेऊन जाऊ शकतात, त्यानंतर कोणत्याही वाहन मालकांच्या दाव्याचा विचार केला जाणार नाही. त्यांना या वाहनांवर कोणताही हक्क गाजवता येणार  नाही. 
येत्या ६ ऑगस्ट रोजी वाहनांचा लिलाव सकाळी ११ वाजता सुरु होईल, या लिलावात अधिकाधिक लोकांना सामील करण्याची आवाहन मारेगाव पोलिस ठाणेदार जगदीश मंडलवार  यांनी केली आहे.
Previous Post Next Post