टॉप बातम्या

राज्यमंत्री ना.बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांसह उद्या रक्तदान शिबीराचे आयोजन: सरचिटणीस हनुमंत तोडे


सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
बीड, (४ जुलै) : किल्लेधारूर शहरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यमंत्री मा.ना.बच्चुभाऊ कडू यांच्या  वाढदिवसानिमित्त दि.०५ जुलै सोमवारला जि.प.मा.विदयालय, किल्लेधारूर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी २ जुलै,३ जुलै ते ५ जुलै असे विविध त्रिदिवशीय सामाजिक कार्यक्रम संपन्न होत असून, उद्या भव्य रक्तदान शिबीर होत आहे. यासाठी इच्छुकांनी सहभागी होण्याचे आयोजकांच्या वतीने आवाहन येत आहे.

आयोजक प्रहार जनशक्ती पक्षाचे बीड जिल्हा सरचिटणीस हनुमंत भाऊ तोडे, पत्रकार गोवर्धन बडे, विष्णू चोले, विशाल तोंडे, हरीदास चौरे, संतोश राठोड, महेश जगताप, सौ.सुमित्रा धस, भारत डोंगरे, डी.एच गाडेकर, रघुवीरसिंग गोके, युनुस शेख, रमेश बडे, यांनी केले आहे.

उद्या सोमवार रोजी जि.प.मा.विदयालय, किल्लेधारूर येथे होत असलेल्या भव्य रक्तदान शिबीरास उपस्थित राहुन इच्छुकांनी रक्तदान करावे. व महाराष्ट्रात होत असलेला रक्त तुटवडा भरून काढावा. या अमूल्य योगदानासाठी सहभागी होण्याचे आवाहन हनुमंत तोडे प्रहार जनशक्ती जिल्हा सरचिटणीस यांनी केले आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क:
हनुमंत भाऊ तोडे मो.नं.९९७०८९७९३६
गोवर्धन बडे मो.नं.७७४४००६४१८
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();