लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेचे तीन वर्षांपासून शारीरिक शोषण

                        (सांग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (३० जुलै) : शहरातील एका तीस वर्षीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे तीन वर्षांपासून शारीरिक शोषण करणाऱ्या शहरातीलच एका युवका विरुद्ध पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा पाठलाग करून तिच्याशी ओळख निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखऊन सदर युवकाने तिचे सतत शारीरिक शोषण केल्याचा आरोप महिलेने वणी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीतून केला आहे. नंतर या युवकाने लग्न करण्यास नकार दिल्याने महिलेने त्याच्या विरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार पोलिस स्टेशनला दाखल केली आहे.

शहरातील सर्वोदय चौक येथे वास्तव्यास असलेल्या विधवा महिलेला लक्ष्मण किशोर खेडकर (२८) रा. मच्छी मार्केट याने प्रेमाचा फास टाकून तिला आपल्या जाळ्यात अडकविले. तो सतत या विधवा महिलेचा पाठलाग करायचा. महिला प्रेमाच्या जाळ्यात अडकताच त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. २०१८ पासून सदर युवकाने तिचे शारीरिक शोषण केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद आहे. लग्नाचे वचन देत तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. नंतर महिलेने लग्नाची गळ घालताच तो टाळाटाळ करू लागला. महिलेने लग्नाचा आग्रह धरल्यानंतर त्याने तिला साफ नकार दिल्याने तिने २८ जुलैला पोलिस स्टेशनला येऊन लक्ष्मण खेडकर याच्या विरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी लक्षण किशोर खेडकर याच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३७६ (२)(N), ४१७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.
लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेचे तीन वर्षांपासून शारीरिक शोषण लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेचे तीन वर्षांपासून शारीरिक शोषण Reviewed by सह्याद्री चौफेर on July 30, 2021 Rating: 5
Powered by Blogger.