टॉप बातम्या

सहस्त्रकुंड, बेंबळा, निळोणा प्रतिबंधित क्षेत्र घोषित : पर्यटकांच्या भ्रमंतीवर बंदी

सह्याद्री न्यूज | राजविलास 
यवतमाळ, (२४ जुलै) : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले, प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. विदर्भ-मराठवाडा सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा दुथडी भरून वाहत आहे.

पर्यटक या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी जातात. सहस्त्रकुंड, बेंबळा, निळोणा येथे पाण्यात बुडून पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सहस्त्रकुंड, बेंबळा, निळोणा प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे.

पर्यटकांच्या भ्रमंतीवर बंदी घालण्यात आली असून, केवळ शोध बचाव पथकालाच या परिसरात फिरता येणार आहे.
Previous Post Next Post