गुरुपौर्णिमे निमित्त स्वरधारा ग्रुप च्या वतीने महाप्रसादाचे वाटप


सह्याद्री न्यूज | दिलदार शेख 
मारेगाव, (२४ जुलै) : मारेगाव येथील नेहमी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वरधारा ग्रुप च्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुरू पौर्णिमे निमित्त येथील मार्डी चौकात महाप्रसाद वाटप चा कार्यक्रम घेण्यात आला.

शहरात सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यास अग्रेसर असलेले स्वरधारा ग्रुप समाजसेवेच्या माद्यमातून हा ग्रुप कार्यास तत्पर असतो, एक हात,गरीबाचा साथ (एक हात मदतीचा हात)या प्रमाणे लॉक डाऊन काळा मध्ये स्वरधारा ग्रुपने शहरातील गोरगरिबांच्या घरोघरी जाऊन अन्न वाटप करून, आवश्यक किटचे वाटप करुन गरजूंना मदत केली. 

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाप्रसाद वाटप करून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. 
येथील मार्डी रोड येथे साईबाबा चे चैलचित्रा चे मंडप साकारून तेथे भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी स्वरधारा गृपचे सर्व सदस्यांनी अथक  परिश्रम घेतले.
गुरुपौर्णिमे निमित्त स्वरधारा ग्रुप च्या वतीने महाप्रसादाचे वाटप गुरुपौर्णिमे निमित्त स्वरधारा ग्रुप च्या वतीने महाप्रसादाचे वाटप Reviewed by सह्याद्री चौफेर on July 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.