टॉप बातम्या

जिल्हा मध्यवर्ती बँक वसुली संदर्भात आढावा बैठक संपन्न


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (२८ जुलै) : जिल्हा मध्यवर्ती बँकेची वसुली संदर्भात आढावा आज बैठक संपन्न झाली. यामध्ये 
जिल्हा मध्यवर्ती बँकचे अध्यक्ष श्री. टिकारामजी कोंगरे  यांनी चालू पिक कर्ज व दुधाळ थकीत कर्ज वसुली संदर्भात सोसायटी सचिव व वसुली अधिकारी यांना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे मानसिक त्रास न देता वसुलीला प्राधान्य द्या अशा सूचना देण्यात आल्या.

कर्ज वसुलीच्या संदर्भात आढावा बैठक आज दिनांक २८ जुलै २०२१ रोजी अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक श्री. टिकारामजी कोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती बँक निरीक्षक व सर्व सोसायटी सचिव सह पुसद मंडळ यांच्या उपस्थितीत जिल्हा मध्यवर्ती पुसद बँकेच्या सभागृहात आज पार पडली.
या बैठकीसाठी मा.श्री. टिकारामजी कोंगरे जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष यवतमाळ, श्री. वसंतराव घुईखेडकर जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष, प्रा. शिवाजी राठोड उपविभागीय अध्यक्ष, संचालक श्री. प्रकाश पाटील देवसरकर, अनुकूल चव्हाण संचालक, श्री. साहेबराव हिवरेकर, विभागीय अधिकारी जऊळगावकर साहेब,  आदीसह तालुक्यातील महागांव, पुसद उमरखेड येथील सोसायटी चे सचिव व बँक निरीक्षक उपस्थित होते.
Previous Post Next Post