सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (१४ जुलै) : पेट्रोल, डिझेल, गॅस व ईतर जिवनावश्यक वस्तुचे दर कमी करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने मारेगावात सायकल रॅली काढून सरकारचे लक्ष वेधले.
गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारने जिवनावश्यक वस्तुचे दर वाढवले आहे.या दरवाढीमुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला दिडपट भाव देण्याची घोषणा करणाऱ्यां केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना फसविले आहे. युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले नाही. तसेच मोदी सरकारने ७ वर्षाचे काळात एकही आश्वासन पुर्ण केले नाही. हे सरकार जनतेच्या पैशाची लुट करीत आहे. जो पर्यंत सरकार ही लुट थांबवित नाही तो पर्यंत सरकारचे विरोधात संपूर्ण देशात तिव्र स्वरुपाची आंदोलने करण्यात येईल असा इशारा निवेदनातुन यावेळी देण्यात आला.
हे आंदोलन वणी विधान सभा मतदार संघाचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वाखाली झाले. यावेळी काँग्रेस चे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, क्रुषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पा.ठाकरे जि.प.सदस्या अरुणाताई खंडाळकर, काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष मारोती गौरकार, काँग्रेसच्या महीला आघाडीच्या अध्यक्षा सुप्रिया जोगी, क्रुषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती वसंत आसुटकर, जि.प.सदस्य, अनिल पा.देरकर, मारेगाव पंचायत समितीचे सभापती शितल पोटे, माजी सभापती शकुंतला वैध, रमन डोये, शंकर मडावी, यादवराव पांडे, रविराज चंदनखेडे आदी होते.
गुरु आनंद पेट्रोल पंप येथुन ही सायकल रॅली काढण्यात येवुन मारेगाव तहसिल कार्यालयात समोर येवुन धडकली मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार दिगांबर गोहोकर यांच्या मार्फत पाठविण्यात आले.
महागाईचे विरोधात काँग्रेसचे मारेगावात आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 14, 2021
Rating:
