लोन काढून देण्याच्या बहाण्याने विवाहित महिलेचा वाटेत केला विनयभंग


सह्याद्री न्यूज | दिलदार शेख 
मारेगाव, (ता.१ जुलै) : मारेगाव तालुक्यातील कुंभा (इंदिरा ग्राम) येथील सेतू केंद्र संचालक विलास नारायण टेकाम यांनी श्रीरामपुर येथील विवाहित महिलेचा लोनचा बहानाकरून वाटेत विनयभंग केला.

याबाबत असे की, आदिवासी शबरी महामंडळाची पाच लाखांची लोन केस करून देतो असे म्हणून विवाहित महिलेला यवतमाळ येत चालण्यासाठी पिडीत महिलेला सेतू केंद्र संचालक विलासने आग्रह धरला. विलास याचा मान ठेवत दि.२९ रोज मंगळवार १०:३० वाजता पिडीत महिला घरुन दुचाकीवर बसुन करजी वरून वाठोडा मार्गे जात असताना पिडीत महिलेला रनींग असलेल्या दुचाकीवर 'तु मला खूप आवडते' असे म्हणून दुचाकी वाठोडा रोड लगत असलेल्या जंगल परिसरात ११:३० वाजतच्या सुमारास पिडीत महिलेचा हात पकडून संशयित आरोपी विलास याने खाली पाळण्याचा प्रयत्न केला असता घाबरलेल्या अवस्थेत पिडीत महिलेने घटनास्थळावरून पळ काढला.

ती रस्त्यावर येवून 'यवतमाळ येथे मला यायचे नाही' असे म्हणून पिडीत महिलेने संशयित आरोपी विलास याला सांगितले. महिलेने पतीला सांयकाळी घरी गेल्यावर सर्व आपबीती सांगीतली. दि २९ जुन रोजी पतीला सोबत घेऊन मारेगाव पोलीस स्टेशन गाठले असता, वाठोडा जंगल परिसर मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत नसल्याने पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये पिडीत महिला पतीला सोबत घेवून विलास नारायण टेकाम वय (४५) रा. इंदिरा ग्राम (कुंभा) यांच्या विरुद्ध तक्रार दाखल दिली असता कलम ३५४ ३५४(अ) ५०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पांढरकवडा पोलीस करित आहे.
लोन काढून देण्याच्या बहाण्याने विवाहित महिलेचा वाटेत केला विनयभंग लोन काढून देण्याच्या बहाण्याने विवाहित महिलेचा वाटेत केला विनयभंग         Reviewed by सह्याद्री चौफेर on July 01, 2021 Rating: 5
Powered by Blogger.