वाठोडा जंगलात मारेगाव तालुक्यातील विवाहितेचा विनयभंग

                          (संग्रहित फोटो) 

सह्याद्री न्यूज | दीपक डोहणे 
मारेगाव, (ता.१ जुलै) : महिला बचत गटावर लाखो रुपयाचे कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी मारेगाव तालुक्यातील श्रीरामपूर येथील विवाहित महिलेचा भुलथापा देवून करंजी- वाठोडा या जंगल रस्त्यालगत विनयभंग केल्याने इंदिराग्राम येथील ४५ वर्षीय इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परिणामी सदर जंगलातून पिडीत महिलेने समयसूचकता दाखवित सुटका केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
      मारेगाव तालुक्यातील श्रीरामपुर येथील २८ वर्षीय महिला मोलमजुरीसह महिला बचत गटाचे कार्य करते.अशातच तिच्या पतीचे दुरवरचे नातेवाईक असलेले इंदिराग्राम येथील संशायित आरोपी विलास नारायण टेकाम (४५) याने घटनेच्या काही दिवसापूर्वी प्रत्यक्ष भेट देवून शबरी आदिवासी महामंडळ तर्फे महिला बचत गटाला पाच लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचा भुलथापा दिल्या.त्यासाठी यवतमाळ मिटींगला जाने अनिवार्य असल्याचे सूतोवाच केले.
     महिला गटाला लाखो रुपये कर्ज मिळत असल्याने 'ती ' महिला यवतमाळ जाण्यासाठी दि.२८ जुलै रोजी विलास सोबत दुचाकीने करंजी वाठोडा मार्गे निघालेत.मात्र विलासच्या मनात नियतिची घालमेल सुरु असतांना करंजी वाठोडा मधोमध असलेल्या जंगलाच्या कडेला दुचाकी थांबविली आणि अश्लील लैंगिक भाषेत बोलून 
नको ती मागणी केली.मात्र पिडितेने सपशेल नकार देत घटना स्थळावरुन कशीबशी सुटका करुन काही अंतरावर पायदळ येत पतीला मोबाईल वरुण संपर्क करित आपबिती कथन केली.काही वेळातच पती करंजी येथे दाखल झाले.
     ओढावलेल्या प्रसंगाची पिडितेने माहिती देत पांढरकवडा पोलिस स्टेशन गाठले.तक्रारी अंती संशायित आरोपी विलास नारायण टेकाम रा.इंदिराग्राम ता.मारेगाव यांचेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान प्रसंगावधान साधून पिडीत महिलेने घटनास्थळावरुन सुटका करवून घेतल्याने समोरील अनर्थ टळल्याची चर्चा ग्रामस्थात सुरु आहे.
वाठोडा जंगलात मारेगाव तालुक्यातील विवाहितेचा विनयभंग वाठोडा जंगलात मारेगाव तालुक्यातील विवाहितेचा विनयभंग Reviewed by सह्याद्री चौफेर on July 01, 2021 Rating: 5
Powered by Blogger.