आई वडीलांचे छत्र हरविलेल्या मुलांच्या वेदनेवर मायेची फुकर


सह्याद्री न्यूज | राजविलास 
यवतमाळ, (१८ जुलै) : दिग्रस तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून डॉ. विष्णू उकंडे व जि. प. सदस्या रुख्मिनीताई उकंडे या दाम्पत्यांनी आमदार संजय राठोड यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातुन साजरा करताना.
या वर्षी मात्र आई, वडील नसलेल्या मुला,मुलींचे वेदनेवर आर्थिक मदत देऊन मायेची फुंकर घालुन शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी भर दिला.

उमलत्या कोमल वयात आपल्या आई वडीलांचे अचानक पणे जाणे हे चिमुरड्यासाठी काय असत. हे कोरोनाच्या संकटात डॉ.विष्णू उकंडे यांनी जाणलं त्यांच्या जिवनातील अस्वस्थता लक्षात घेऊन. अनाथांच्या दु:खावर फुंकर घालण्यासाठी डॉ विष्णू उकंडे प्रतिष्ठान व प्रेरणा संस्थेमार्फत. आर्थिक मदतीचा हात समोर करत. दिग्रस तालुक्यातील ३० ते ३५ मुला मुलींना आर्थिक स्वरूपात खारीचा वाटा वाटप करन्यात आली,यावेळी आमदार संजय राठोड यांनी डॉ विष्णु उकंडे यांचे कौतुक करून प्रत्येक मुला मुलीना १० हजार रुपये (दहा हजार रुपये) मदत राष्ट्रीयकृत बँके मध्ये फिक्स स्वरूपात त्यांनी स्वतः हा टाकणार असे सांगितले. दिग्रस येथील विश्रामगृह येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी. सुधीर देशमुख, राहुल शिंदे, संजय कुकडी, जि. प सदस्य हितेश राठोड, जि. प सदस्य लखन राठोड, माजी जि. प सदस्य दिवाकर राठोड, पं. स सदस्य विनोद जाधव, नितीन सोनुलकर, राहुल देशपांडे, बालाजी ठाकरे, नगरसेवक अजिंक्य मात्रे, नगरसेवक सैय्यद अक्रम, संदिप जाधव, दिनेश खाडे व ईतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आई वडीलांचे छत्र हरविलेल्या मुलांच्या वेदनेवर मायेची फुकर आई वडीलांचे छत्र हरविलेल्या मुलांच्या वेदनेवर मायेची फुकर Reviewed by सह्याद्री चौफेर on July 18, 2021 Rating: 5
Powered by Blogger.