राजूर कॉलरी येथील प्रमुख रस्त्यावर टाकला जातो घाण कचरा

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (१५ जुलै) : राजूर कॉलरी येथे असुविधा व अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलं आहे. असुविधेमुळे नागरिकांचा मनःस्ताप होत आहे. तर अस्वच्छतेमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. सोई सुविधा व स्वच्छतेच्या अभावामुळे येथील नागरिकांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. राजूर कॉलरी येथील वार्ड क्रमांक ३ मधून जाणारा प्रमुख रस्ता कचरा साठवणूकीचं केंद्र बनला आहे. या प्रमुख रहदारीच्या रस्त्याच्या अगदी कडेलाच कचरा टाकला जात असल्याने याठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. पावसामुळे कचऱ्याचे घाणीत रूपांतर होऊन परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हा रस्ता वस्ती, शाळा व चुना कारखान्यांकडे जाणारा प्रमुख रस्ता असून या रस्त्याने नागरिकांचे नेहमी जाणे येणे सुरु असते. या रस्त्यावरील घाण कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे या रस्त्याने जाणे येणे कठीण झाले आहे. हा घाण कचरा आता रस्त्यावर पसरू लागल्याने रस्ताच अरुंद झाला आहे. या घाण कचऱ्यातुन दुर्गंधी पसरू लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून परिसरात अस्वच्छता निर्माण झाल्याने संसर्गजन्य आजार वाढू लागले आहेत. अनेक वर्षांपासून वार्ड क्रं. ३ मध्ये कचरा कुंडी बसविण्याची मागणी होत आहे. पण ग्रामपंचायत प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे. ग्रामपंचायतेच्या वेळ काढू धोरणामुळे नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. 

राजूर कॉलरी येथील वार्ड नंबर ३ मधून जाणाऱ्या प्रमुख रहदारीच्या रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. रस्त्याच्या कडेलाच केरकचरा टाकला जात असल्याने या रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर नेहमी डुकरांचा हौदोस सुरु असतो.
पावसामुळे कचऱ्याचे घाणीत रूपांतर झाले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. डुकरे कचरा पसरवून रस्त्यावर आणत असल्याने हा प्रमुख रहदारीचा रस्ता अरुंद झाला आहे. हा रस्ता जि. प. सदस्य संघदीप भगत यांनी खेचून आणलेल्या निधीतून तयार करण्यात आला आहे. आधी हा कचरा एक महिन्याच्या अंतरात ग्रामपंचायतेकडून उचलल्या जायचा. पण आता चार महिने लोटले तरी हा कचरा ग्रामपंचायतेने उचलला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना व रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना या दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

 कचरा साठवणुकीकरिता परिसरात कचरा कुंडी बसविण्याची अनेक वर्षांपासून ओरड होत असतांना ग्रामपंचायत प्रशासन बहिरेपणाचं सोंग घेत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. या घाण कचऱ्यामुळे पसरलेली दुर्गंधी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. आधीच साथीच्या रोगाचा काळ सुरु असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतांना परिसरातील अस्वच्छता साथीचे आजार बळावण्यास कारणीभूत ठरू पहात आहे.

 ग्रामपंचायतेने या प्रमुख रस्त्यालगत टाकण्यात आलेला घाण कचरा त्वरित उचलून या परिसरात कचरा साठविण्याकरिता कचरा कुंडी बसविण्याची मागणी वार्ड क्रमांक ३ मधील नागरिकांनी केली आहे.
राजूर कॉलरी येथील प्रमुख रस्त्यावर टाकला जातो घाण कचरा राजूर कॉलरी येथील प्रमुख रस्त्यावर टाकला जातो घाण कचरा Reviewed by सह्याद्री चौफेर on July 15, 2021 Rating: 5
Powered by Blogger.