मावळणी येथे शेतकरी प्रशिक्षण संपन्न
सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब, (२३ जुलै) : मावळणी येथे रिलायन्स फॉउंडेशन व संत कबीर संस्था मार्फत गावातील शेतकऱ्यांना शेतीवर आधारित विविध व्यवसाय संधी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कोरोना काळात सर्व शेतकऱ्यांना प्रशिक्षण स्थळी मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले असून, त्यांचा वापर करून प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये, शेळीपालन, गाय-म्हशी पालन, दुग्धव्यवसाय, खत व्यवस्थापन, गांडूळखत, कुक्कुटपालन, शासकीय योजना, अशा विविध प्रकारची माहिती देण्यात आली.
शेतकऱ्यांनी शेतीला धरून जोडधंदा म्हणून व्यवसाय करावा, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक श्री. अतुल राऊत सर, यांनी केले, तसेच गावातील शेतकरी, ग्रामपंचायत सरपंच, मा. दीपालीताई जामुनकर, उपसरपंच मा. मनिषाताई काटे(भोसले), सदस्य पिंटूभाऊ कांबळे, उद्योगसखी रूपालीताई गणेशकर, रिलायन्स फॉउंडेशन अमित वाढोनकर यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.