नरसाळा येथे लसीकरण शिबीर:१५६ जणांनी घेतली लस


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२० जुलै : तालुक्यात लसीकरणाला वेग पकडला असून अनेक गावात लस घेण्यासाठी लोकांत उत्साह वाढला आहे. रविवारला तब्बल १५६ लोकांनी लस टोचून घेतली. 

सुरुवातीला कोरोनाच्या प्रतिबंधक उपाय म्हणून लस घेण्याचे आवाहन मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. परंतु अनेक नागरिक लस घेण्यात धजावत नव्हते,मात्र जसजसी लोकांत लसीबद्दल जनजागृती होत आहे. त्यामुळे नागरीकही मोठ्या प्रमाणात लस टोचून घेत आहे. आता लस टोचून घेणारे जास्त होत असल्याने लस घेणाऱ्यांना वाट बघावी लागत आहे. 

लसीकरणाच्या उद्देश पूर्ण करण्यासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध व्हायला पाहिजे. असे तरुणाचे मत आहे. तालुक्यात गावागावात लसीकरण सुरू असून दि.१८/जुलै ला ग्रामपंचायत तर्फे कोविड लसीकरण कॅम्प लावण्यात आला होता. त्यात १५६ लोकांचे लसीकरण करण्यात आले. त्यावेळी सरपंच संगीत मरस्कोले उपसरपंच यादवराव पांडे व सदस्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यावेळी लांबट, कुडमेथे, डॉ. कोडपे, जया भुसारी, गीता कुडमेथे, मीना राऊत यांनी काम पाहिले.
नरसाळा येथे लसीकरण शिबीर:१५६ जणांनी घेतली लस नरसाळा येथे लसीकरण शिबीर:१५६ जणांनी घेतली लस Reviewed by सह्याद्री चौफेर on July 20, 2021 Rating: 5
Powered by Blogger.