सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नायगाव, (२९ जुलै) : तालुक्यातील जयराज पॅलेस येथे योद्धा सेना ग्रुपची पहिली बैठक संपन्न झाली. समाजात आपले दैनंदिन जिवन जगत असताना सर्वांना अडचणी येत असतात, काही अडचणी, समस्या ह्या सुटतात व काही समस्यांचा निराकरण कधीच होत नाही. अशा लहान मोठ्या समस्या लक्षात घेऊन नायगाव तालुक्यातील युवा समाजकार्य तसेच जनहीतासाठी मैदानात उतरली. योद्धा सेना ग्रुप हा एक सामाजिक ग्रुप असुन त्यामध्ये तब्बल दिडशे ते दोन युवा नेतृत्वांचा समावेश आहे. योद्धा सेना ग्रुप मध्ये सर्व जाती धर्माचा समावेश आहे.
दिनांक २८ जुलै रोजी दुपारी जयराज पॅलेस नायगाव येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. समाजकार्याची जिद्द पाहता, योद्धा सैनिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. योद्धा सेनेचे धैय व उद्देश सर्वांपुढे मांडल्यानंतर सर्व योद्धांनी जयघोष करत या बैठकीस पुर्णविराम दिला आहे.
या बैठकीत योद्धा सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल गायकवाड, नायगाव तालुका अध्यक्ष दाऊद शेख अंजनीकर, आझाद समाज पार्टीचे विद्यार्थी युवा मोर्चा नायगाव तालुका अध्यक्ष साईनाथ नामवाडे, रिपाई चे विद्यार्थी युवा मोर्चा नायगाव ता. अध्यक्ष आमिर पठाण, पत्रकार मंगेश झगडे, पत्रकार धमानंद गायकवाड, सुर्या भाऊ गायकवाड, बाळासाहेब घंटेवाड, महेश पवार, गायकवाड, विकास सोनटक्के, प्रदिप मगरे, रऊफ पठाण, नितीन वने, राजेश गायकवाड, रुषिकेश रोडे, विषाल कागदेवाड, रोहीत सुर्यवंशी, रोहन वाघमारे, सुमेध झगडे, राजेंद्र वाघमारे, सिद्ध वाघमारे, प्रकाश वाघमारे, नागोराव बोयाळ, गोतम वाघमारे, आमोल आयलवार, पुनम धमनवाडे आदीसह तब्बल तीस ते चाळीस योद्धा सैनिक उपस्थित होते.
नांदेड : गौतम गावंडे
समाजकार्य व जनहितासाठी योद्धा सेना ग्रुपचे युवा रनांगणात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 29, 2021
Rating:
