Top News

नराधमाला पोलिसांनी केली अटक, राजूर (कॉलरी) येथील संताप जनक घटना

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (१२ जुलै) : प्रात: विधिस गेलेल्या एका आठ वर्षीय चिमुकलीवर विकृती संचारलेल्या एका 22 वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची संताप जनक घटना राजूर कॉलरी येथे घडली.

सकाळी 9 वाजता रेल्वे पुलानजिक शौचालयास गेलेल्या चिमुकलीचा मागोवा करुन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या वार्डातीलच एका युवका विरुध्द मुलीच्या वडिलाने पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तत्काळ आरोपिला अटक करुन त्याच्यावर पोक्सो व अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दखल केला आहे. मुलीला वैद्यकीय तपासणी करिता यवतमाळला पाठविण्यात आले आहे.

राजूर कॉलरी येथे राहणारी आठ वर्षीय चिमुकली प्रातविधी करिता रेल्वेपुला नजिक गेली होती. तिच्या मागावर असलेल्या आरिफ खान नसीम खान (22) रा. वार्ड क्र. 4 राजूर कॉलरी याने वाईट उद्देशाने तिच्याशी अंगलट येण्याचा प्रयत्न केला. तिने ही बाब आपल्या वडिलांना सांगितली. वडिलांनी मुलीला घेऊन सरळ पोलिस स्टेशन गाठले व विकृत मनोवृत्तीच्या या युवका विरुध्द रितसर तक्रार नोंदविली. पोलिसांनी तत्काळ आरिफ खान नासिर खान या आरोपीला अटक करुन त्याच्यावर भादंवि च्या कलम 376 (अ) (ब), 366 (अ), पोक्सो व अनुसूचित जाती जमती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पिडीत मुलीला वैद्यकीय तपासणी करिता यवतमाळला पाठविण्यात आले आहे.

पुढील तपास एसडीपीओ संजय पुज्जलवार व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात एपिआय माया चाटसे करित आहे.
Previous Post Next Post