अखेर पिवरडोल येथील वाघ पकडला, २ दिवसापासून होते सुरु 'रेस्क्यू ऑपरेशन'


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (१२ जुलै) : नुकतेच मिळालेल्या माहिती नुसार पिवरडोल या शेतशिवारातील रंगा नावाच्या वाघाला पकडण्यात आले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे गावात काहीसे दिलासा दायक वातावरण निर्माण झाले. 

झरी तालुक्यातील पिवरडोल येथील अविनाश लेनगुरे नामक या अठरा वर्षीय युवकाला ठार केल्यानंतर येथील गावाकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत लेनगुरे परिवाराला आर्थिक मदत आणि घरातील व्यक्तीला नौकरी व गावाला तार कुंपणाची सुरक्षा करून दिल्याशिवाय पंचनामा व अंत्यसंस्कार करणार नाही अशी प्रमुख मागणी लेखी दिल्या नंतर अविनाश वर अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने वाघाला पकडण्यासाठी अमरावती नागपूर वरून बोलावून हे पथक काल च्या पहाटेपासून रेस्क्यू ऑपरेशन लगातार सुरु होते. त्यामुळे गावाकऱ्यात काहीसे समाधान दिसत असतांना आज पुन्हा काही वाघाचा घुमजावं झाल्याने धावा धावा वाघ आला वाघ! म्हणून गावाकऱ्यांनी वाघाच्या दिशेने धाव घेतली असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पुन्हा पिवरडोल येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दिनांक ११ जुलै च्या पहाटे पासून पांढरकवडा, पाटण, बोरी सर्कल मधील सर्व अधिकारी धडकले असून सर्वतोपरी येथील वाघाला पडकण्याचे काम सुरु होते. मात्र, वाघ कोणाच्या हाती लागत नसून परिसतील दिसेल त्यावर वाघ हल्लाबोल करीत असल्याचे समजते. ज्या दिवशी अविनाश ला वाघाने ठार केले त्याच दिवशी,च्या दरम्यान एका गायीचा ही वाघाने फडशा पडल्याचे चर्चा आहे. तसेच या परिसरात एक नाही तर तब्बल सहा वाघ असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाघ्याच्या मुक्त संचारामुळे येथील शेतकरी शेतमजूरांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीच्या कामकाजावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून जुनोनी पिवरडोल शेतशिवारातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून जीव मुठीत घेऊन दहशतीखाली जिणं लोकं जगत आहे.             (वाघाला पकडून आणताना पथक) 

त्यामुळे या परिसरातील वाघ पकडणे अतिशय गरजेचे झाले आहे, नाहीतर येथील वास्तव्यास असणाऱ्यांचे हेच वाघ लचके तोडल्याशिवाय राहणार नाही असे, येथील लोकं सांगत असतांनाच रंगा नावाने संबोधले जाणाऱ्या वाघाला पकडण्यात आल्याचे माहिती मिळाली आहे. दोन दिवसापासून येथे रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते त्याला आज यश आल्याचे सांगितले जात आहे.



अखेर पिवरडोल येथील वाघ पकडला, २ दिवसापासून होते सुरु 'रेस्क्यू ऑपरेशन' अखेर पिवरडोल येथील वाघ पकडला, २ दिवसापासून होते सुरु 'रेस्क्यू ऑपरेशन' Reviewed by सह्याद्री चौफेर on July 12, 2021 Rating: 5
Powered by Blogger.