मनसेकडून शुक्रवारी 'मदत' कोकणाकडे रवाना होणार - राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांची माहिती

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
यवतमाळ, (२८ जुलै) : गेल्या काही दिवसांत पावसाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला आणि पुराबरोबरच दरडी कोसळण्याच्या घटनांनी अख्खी गावंच्या गाव माळीणसारखीच क्षणार्धात होत्याची नव्हती झाली.

कोकणात आलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांना आपले सर्व काही गमवावे लागले असून हजारो कुटुंब बेघर झाली आहे. हा एकूणच घटनाक्रम आणि संभाव्य उपाययोजना म्हणून मनसे आता कोकण पूरग्रस्तांना मदत करण्याकरिता सरसावली आहे. मा. राजसाहेब ठाकरे यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना सैनिकांना सूचना दिल्या. त्यांचे आदेशानुसार राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर यांनी शुक्रवारी वणीतून मदतीचा ट्रक जीवनाश्यक साहित्यसह पूरग्रस्तांना पाठविली जाणार आहे अशी माहिती दिली.

मागील काही दिवसात प्रचंड पाऊस झाल्याने कोकणातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक कुटुंबे रस्त्यावर आली, अन्न, कपडे, रोख रकमा पुरात वाहून गेली. अनेकांचे बळी गेले. परिणामी कोकणात आलेल्या अतिवृष्टीमुळे येथील जीवन उध्वस्त झाले आहे. त्यांना मदतीची नितांत गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन मनसेकडून स्वखर्चाने ही मदत दिली जाणार आहे.

त्यात १ हजार ब्लँकेट, १ हजार साड्या, ३ हजार बिस्कीट पुडे, ३ हजार पाणी बॉटल, ५ टन तांदूळ, दीड टन डाळ, १ हजार टॉवेल, झटपट तयार होणाऱ्या नास्त्याचे साहित्य आदींचा समावेश असणार आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता च्या दरम्यान, शिवाजी चौक वणी येथून साहित्याने भरलेला हा ट्रक कोकणाकडे रवाना होणार, मनसेकडून मदतीची पहिली खेप शुक्रवारी रवाना होत आहे. वणीतील ज्या नागरिकांना स्वेच्छेने मदत द्यायची असेल, त्यांनी केवळ वस्तू स्वरूपात आपली मदत मनसेच्या रूग्णसेवा केंद्रात आणून द्यावी, रोख रक्कम स्वीकारल्या जाणार नाही असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.



मनसेकडून शुक्रवारी 'मदत' कोकणाकडे रवाना होणार - राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांची माहिती  मनसेकडून शुक्रवारी 'मदत' कोकणाकडे रवाना होणार - राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांची माहिती Reviewed by सह्याद्री चौफेर on July 29, 2021 Rating: 5
Powered by Blogger.